वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
केमिस्ट अँन्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या जिल्हाध्यक्ष पदी धनाजी आनंदे यांची निवड झाल्याबद्दल तसेच जिल्हा कार्यकरिणी सदस्य यांचा लोहारा तालुका केमिस्ट अँन्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने लोहारा येथे सत्कार करण्यात आला. तसेच महात्मा ज्योतिबा फुले स्मृती ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार पत्रकार गिरीश भगत यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
केमिस्ट अँन्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या जिल्हाध्यक्ष पदी धनाजी आनंदे यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त लोहारा तालुका केमिस्ट अँन्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाध्यक्ष आनंदे व जिल्हा कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच लोहारा येथील पत्रकार गिरीश भगत यांना महात्मा ज्योतिबा फुले स्मृती ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल पत्रकार गिरीश भगत यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा सचिव किरण हंगरगे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश्वर मुदकणा, जिल्हा कोषाध्यक्ष कुणाल गांधी, दिनेश वाबळे, उमरगा तालुकाध्यक्ष आनंद बरमदे, लोहारा तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, पंडित ढोणे, वैभव चौधरी, पंडित चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष भरत सुतार, सचिन बिराजदार, गणेश हिप्परगे, विकास होंडराव, गणेश सारंग, अविनाश भुजबळ, उमेश देवकर, कृष्णा घोडके, विक्रम जावळे, मारुती कृपाळ, युवराज शिंदे, इंगोले, सुमित फावडे, विशाल जावळे, सत्येश्वर ढोबळे, सतीश दबडे, भाऊसाहेब देशमुख, शाहूराज चव्हाण, फय्याज शेख, महेश खबोले, प्रवीण अभंगराव आदी उपस्थित होते.