वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
दि. ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून निलंगा तालुक्यातील सर्व बँकेत बचत गटांसाठी बँक कर्ज वाटप मेळावे घेण्यात आले. यात ६५ गटांना एक कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान पंचायत समिती निलंगाच्या वतीने जागतिक महिला दिन विवीध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यात आर्थिक साक्षरता प्रशिक्षण, महिला मेळावे व बँकेत कर्ज वाटप मेळावे घेण्यात आले. एकाच दिवशी ६५ गटांना एक कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले.
यात SBI उस्तुरी 14 गट 14 लाख, औराद 13 गट 27 लाख, निलंगा 3 गट 6 लाख, दत्तनगर 2 गट 4 लाख, किल्लारी 2 गट 4 लाख तसेच MGB च्या कासार शिरशी बँकेत 10 गट 10 लाख, पान चिंचोली 6 गट 12 लाख, कासार बालकुंदा 5 गट 5 लाख, निलंगा 3 गट 5 लाख, औराद 6 गट 13 लाख तर HDFC बँकेच्या वतीने 1 गटाला 2 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. निलंगा तालुक्यात जवळपास 3 हजार बचत गट आहेत. या वर्षी 762 गटांना 16 कोटी रुपयांचे बँक कर्ज मिळऊन देण्याचे उद्दिष्ट प स निलंगाला आहे. त्या पैकी आज अखेर 743 गटांना 12 कोटी 8 लाख रुपयांचे बँक कर्ज तालुक्यातील 16 बँकेच्या माध्यमातून वाटप करण्यात आले आहे. 31 मार्च पर्यंत तालुक्याचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण होईल असा विश्वास गट विकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी व्यक्त केला आहे.
सर्व बँकेत कर्ज मेळावे घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोत्ती अभियान चे तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश, व्यवस्थापक शरद सन्मुखराव , अरुण शाहीर, प्रभाग समन्वयक लिंबराज कुंभार, सच्चीदानंद आयनिले, नितीन रोडे, उमा कोरे, गोविंद रावते, त्रिंबक लहाने, वर्षा देशमुख, प्रशांत चिलमे आणि सर्व बँक सखी आदींनी परिश्रम घेतले. निलंगा तालुक्याच्या या उपक्रमाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, प्रकल्प संचालक प्रभू जाधव, जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे, व्यवस्थापक अनिता माने, वैभव गुराळे लीड बँक व्यवस्थापक कसबेकर सर यांनी निलंगा टीमचे कौतुक केले आहे. या उपक्रमाबद्दल सर्व बँक व्यवस्थापक यांचे तालुका अभियान व्यवस्थापन यांनी आभार मानले..