Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

दिवाळी निमित्त महिला स्वयंसहाय्यता गटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन – उपसभापती व्यंकट कोरे व गटविकास अधिकारी सोपान अकेले यांची प्रमुख उपस्थिती

admin by admin
27/10/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती लोहारा यांच्या वतीने पंचायत समिती लोहारा परिसरात दिवाळीनिमित्त विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन पंचायत समितीचे उपसभापती व्यंकट कोरे, गटविकास अधिकारी सोपान अकेले, सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम यांच्या हस्ते बुधवारी (दि. २७) करण्यात आले. सदरील विक्री व प्रदर्शन दि. ३१ ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे.दिवाळीनिमित्त स्वयंसहाय्यता गटांतील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन लोहारा पंचायत समिती आवारात दि. ३१ पर्यंत ठेवण्यात आले आहे. याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. यावेळी बोलताना गटविकास अधिकारी सोपान अकेले म्हणाले की, महिला आर्थिक सक्षम होऊन विविध व्यवसायामध्ये आपल्या कौशल्याचा वापर करून विविध प्रकारचे उत्पादन तयार करत आहेत. सदर उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी याकरिता सदर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी त्यांनी सांगितले. सहाय्यक गटविकास अधिकारी अमित कदम यांनी तालुक्यातील गटांनी ऑनलाईन मार्केटिंगसाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. तालुक्यातील नागरिकांनी सदर प्रदर्शनास भेट देऊन महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना खरेदी करून बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी असे आवाहन उपसभापती व्यंकट कोरे यांनी केले. प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक अलंकार बनसोडे यांनी केले. महाराष्ट्रामध्ये उमेद अभियान अंतर्गत स्थापन केलेल्या स्वयंसहाय्यता गटातील महिलांच्या विविध वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी तालुका व जिल्हा स्तरावर अशा प्रकारच्या विक्री व प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगीतले. सूत्रसंचलन किशोर हुडेकर यांनी तर प्रीतम बनसोडे यांनी आभार मानले.या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे नागनाथ कुंभार, के. एल. राठोड, श्रीनिवास पाटील, किरण निंबाळकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अमोल कासार, प्रणिता कटकदौंड, रामेश्वर दुरगुळे, अन्तेश्वर माळी, किशोर हुडेकर, सचिन गायकवाड, नंदन थोरात, प्रदीप लोंढे, मंगल गायकवाड, योगिता थोरात, माधुरी मुळे यांनी परिश्रम घेतले. सदर विक्री व प्रदर्शनामध्ये तालुक्यातील विविध महिला गटांनी बनविलेले, मसाले, चटणी, लाडू, चकली, खवा, पणती, हस्तकलेच्या वस्तू, लोणचे आदी विविध वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: उमेद अभियान
Previous Post

जिल्हास्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल माकणी येथील गौरीशंकर कलशेट्टी यांचा सत्कार

Next Post

दिव्यांगानी पथनाट्यातून केले संवैधानिक नागरी हक्कांबाबत जनजागरण –

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

दिव्यांगानी पथनाट्यातून केले संवैधानिक नागरी हक्कांबाबत जनजागरण -

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's