वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग सदस्य ही खुप मोठी जबाबदारी आहे. पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ताच्या कामाची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन मला काम करण्याची संधी दिली. त्यांच्या या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे मत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी निवड झालेले प्रा. डॉ. गोविंद काळे यांनी व्यक्त केले
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग सदस्यपदी प्रा. डॉ. गोविंद काळे यांची निवड झाल्याबद्दल लोहारा तालुक्यातील फणेपुर येथे रविवारी (दि.२०) नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे होते. या कार्यक्रमासाठी उमरगा- लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले, हृदयरोग तज्ञ डॉ. प्रमोद पवार, शिवसेना लोहारा तालुकाप्रमुख मोहन पणुरे, उमरगा तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे, माजी नगरसेवक अभिमान खराडे, जग्गनाथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना प्रा. गोविंद काळे म्हणाले की , माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षाने माझ्या एकनिष्टमुळे व कार्यामुळे मोठी जबाबदारी दिली आहे . सर्वोच्च न्यायालयाने मराठा बांधवांचे शिक्षण व नोकरीतील फेटाळलेले आरक्षण व इतर मागासवर्गाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील फेटाळलेले आरक्षण हे प्रश्न कसे मार्गी लावता येईल यासाठी दिवस – रात्र एक करून सर्व समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी बोलताना आमदार ज्ञानराज चौगुले म्हणाले की, जात, धर्म न बघता एकनिष्ठ व कार्यक्षम असलेल्यांना पक्ष व आम्ही पाठबळ देतो. यापुढेही प्रा. गोविंद काळे यांना भविष्यात मोठी जबाबदारी दिली जाईल अशी ग्वाही आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली. अध्यक्षीय भाषणामध्ये नितीन काळे म्हणाले की, राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य हे पद मंत्रालयातील सचिव दर्जाचे पद असुन हे गोविंद काळे सरांसारख्या प्रमाणात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ठाकरे सरकारने न्याय दिला याबद्दल ठाकरे सरकारचे अभिनंदन करतो. मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणाबाबत न्याय भुमिका घेतील अशी आशा व्यक्त केली.
यावेळी सरपंच साहेराबी मुल्ला, उपसरपंच नागनाथ निंगशेट्टी, मा. सरपंच मुक्ताबाई भोजने, शाखा अभियंता राजेंद्र माळी, मा. उपसरपंच दत्तात्रय काळे, ग्रा.प. सदस्य बालाजी भोजने, सौ. शोभा सगर, आयुब मुल्ला, श्रीमंत गवंडी, सौ. वंदना काळे, व्यंकट भोजने, शंकर स्वामी, वैजीनाथ भिसे, सोमनाथ माळी, सोमनाथ भंडारकवठे, महेश पाटील, आप्पाराव भंडारकवठे, सचिन करे, यादव जाधव, पृथ्वीराज काळे आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!
No Result
View All Result