Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल प्रा. डॉ. गोविंद काळे यांचा सत्कार – आमदार ज्ञानराज चौगुले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांची प्रमुख उपस्थिती – लोहारा तालुक्यातील फनेपुर येथे नागरी सत्कार कार्यक्रम संपन्न

admin by admin
20/06/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग सदस्य ही खुप मोठी जबाबदारी आहे. पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ताच्या कामाची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन मला काम करण्याची संधी दिली. त्यांच्या या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे मत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी निवड झालेले प्रा. डॉ. गोविंद काळे यांनी व्यक्त केले
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग सदस्यपदी प्रा. डॉ. गोविंद काळे यांची निवड झाल्याबद्दल लोहारा तालुक्यातील फणेपुर येथे रविवारी (दि.२०) नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे होते. या कार्यक्रमासाठी उमरगा- लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले, हृदयरोग तज्ञ डॉ. प्रमोद पवार, शिवसेना लोहारा तालुकाप्रमुख मोहन पणुरे, उमरगा तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे, माजी नगरसेवक अभिमान खराडे, जग्गनाथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना प्रा‌. गोविंद काळे म्हणाले की , माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षाने माझ्या एकनिष्टमुळे व कार्यामुळे मोठी जबाबदारी दिली आहे . सर्वोच्च न्यायालयाने मराठा बांधवांचे शिक्षण व नोकरीतील फेटाळलेले आरक्षण व इतर मागासवर्गाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील फेटाळलेले आरक्षण हे प्रश्न कसे मार्गी लावता येईल यासाठी दिवस – रात्र एक करून सर्व समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी बोलताना आमदार ज्ञानराज चौगुले म्हणाले की, जात, धर्म न बघता एकनिष्ठ व कार्यक्षम असलेल्यांना पक्ष व आम्ही पाठबळ देतो. यापुढेही प्रा. गोविंद काळे यांना भविष्यात मोठी जबाबदारी दिली जाईल अशी ग्वाही आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली. अध्यक्षीय भाषणामध्ये नितीन काळे म्हणाले की, राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य हे पद मंत्रालयातील सचिव दर्जाचे पद असुन हे गोविंद काळे सरांसारख्या प्रमाणात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ठाकरे सरकारने न्याय दिला याबद्दल ठाकरे सरकारचे अभिनंदन करतो. मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणाबाबत न्याय भुमिका घेतील अशी आशा व्यक्त केली.
यावेळी सरपंच साहेराबी मुल्ला, उपसरपंच नागनाथ निंगशेट्टी, मा. सरपंच मुक्ताबाई भोजने, शाखा अभियंता राजेंद्र माळी, मा. उपसरपंच दत्तात्रय काळे, ग्रा.प. सदस्य बालाजी भोजने, सौ. शोभा सगर, आयुब मुल्ला, श्रीमंत गवंडी, सौ. वंदना काळे, व्यंकट भोजने, शंकर स्वामी, वैजीनाथ भिसे, सोमनाथ माळी, सोमनाथ भंडारकवठे, महेश पाटील, आप्पाराव भंडारकवठे, सचिन करे, यादव जाधव, पृथ्वीराज काळे आदी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

मुरूम येथील माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय वाचन दिन साजरा – २५ जून पर्यंत वाचन सप्ताह

Next Post

कोविड १९ लसीकरणासाठी आता ऑनलाइन व ऑनस्पॉट दोन्ही पद्धतीने होणार नोंदणी – सायंकाळी पाच वाजता स्लॉट्स खुले होणार

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post

कोविड १९ लसीकरणासाठी आता ऑनलाइन व ऑनस्पॉट दोन्ही पद्धतीने होणार नोंदणी - सायंकाळी पाच वाजता स्लॉट्स खुले होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's