Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

राजर्षी शाहू महाराजांचे वंशज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशजांच्या भेटीला – छत्रपती संभाजीराजे घेणार प्रकाश आंबेडकर यांची भेट – इतिहासाची पुनरावृत्ती होणार – योगेश केदार यांनी दिली माहिती

by admin
in महाराष्ट्र
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मराठा समाजाच्या आरक्षणसंदर्भात मागील दोन तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आज छत्रपती संभाजीराजे व प्रकाश आंबेडकर यांची भेट होणार आहे. या भेटीला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज प्रकाश आंबेडकर यांची भेट होणार असल्याने आजचा दिवस महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय जीवनाला कलाटणी देणारा असल्याचे बोलले जात आहे. शिव शाहूंचे वंशज, मराठा समाजाचे आशा स्थान, छत्रपती संभाजी महाराज घेणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशाजाची भेट… यापूर्वी राजर्षी छत्रपती शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला स्वतः होऊन त्यांच्या घरी गेले होते. त्यानंतर इतिहास घडला… त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आज होणार आहे.
मराठा आरक्षणाचा लढा जातीपातीच्या कक्षा ओलांडून पुढे जात आहे. समाजातील सर्वांना विश्वासात घेऊन, त्यांची साथ घेऊनच मराठा आरक्षणाचा तिढा सुटू शकतो, ही दूरदृष्टी संभाजीराजेंनी ठेवली आणि सर्वांच्या भेटीगाठी सुरू केल्या. त्याचाच एक भाग आजची प्रकाशजी आंबेडकरांची भेट. संभाजी महाराज हे बहुजनांच्या मनात काय चाललय याचा अचूक वेध घेणारे नेतृत्व आहे. अठरापगड जाती, बारा बलुतेदार, व सर्व बहुजन समाज एकत्रित गुण्या गोविंदाने राहिला पाहिजे ही संभाजीराजांची भूमिका भूमिका आहे. छत्रपती संभाजीराजे आज सायंकाळी चार च्या दरम्यान प्रकाश आंबेडकर यांच्या पुणे येथील निवासस्थानी भेट घेणार आहेत अशी माहिती छत्रपती संभाजीराजे यांचे स्वीय सहाय्यक योगेश केदार यांनी दिली आहे.

Ad 2
Ad 1
Tags: ऐतिहासिक भेटछत्रपती संभाजीराजेप्रकाश आंबेडकर
Previous Post

लोहारा तालुक्यातील सालेगाव येथे बँक आपल्या दारी उपक्रम – निराधारांना पगारीचे घरपोच वाटप – लाभार्थ्यातून व्यक्त केले जात आहे समाधान

Next Post

सोमवारी ( 31 मे ) 45 वर्षांच्या वरील नागरिकांना मिळणार कोविशील्ड लस – ज्या लाभार्थ्यांनी पहिला डोस घेऊन 84 दिवस झाली आहेत त्यांना मिळणार दुसरा डोस – लोहारा तालुक्यात 6 ठिकाणी होणार लसीकरण – लोहारा, सास्तुर, भातागळी, धानुरी, जेवळी (दक्षिण), दस्तापुर येथे होणार लसीकरण

Related Posts

महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

महाराष्ट्र

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

महाराष्ट्र

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Next Post

सोमवारी ( 31 मे ) 45 वर्षांच्या वरील नागरिकांना मिळणार कोविशील्ड लस - ज्या लाभार्थ्यांनी पहिला डोस घेऊन 84 दिवस झाली आहेत त्यांना मिळणार दुसरा डोस - लोहारा तालुक्यात 6 ठिकाणी होणार लसीकरण - लोहारा, सास्तुर, भातागळी, धानुरी, जेवळी (दक्षिण), दस्तापुर येथे होणार लसीकरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!