वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
काँग्रेस पक्ष हा सर्वधर्म समभाव मानणारा पक्ष आहे. आपण सर्वांनी मिळून काँग्रेसला एक नंबरचा पक्ष म्हणून ओळख निर्माण करून देऊया. या पुढील काळात हा तालुका काँग्रेसमय केल्याशिवाय आपण स्वस्थ राहणार नाही असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले.
लोहारा तालुका काँग्रेस पार्टीच्या वतीने लोहारा शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात रविवारी (दि. १२) कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, माजी जि प उपाध्यक्ष अशोकराव जवळगे, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील, प्रदेश सचिव दिलीप भालेराव, लोहारा पंचायत समितीच्या सभापती हेमलता रणखांब, जिल्हा उपाध्यक्ष दिपक जवळगे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, जि प चे माजी सभापती दत्ता पाटील, लोहारा कृ. उ. बा. समितीचे माजी संचालक शंकर जट्टे, लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील, आबासाहेब साळुंके, उपसभापती व्यंकट कोरे, बुद्धिवंत साखरे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलताना बसवराज पाटील म्हणाले की, आज धर्मधर्मात भांडणे लावायचे काम चालू आहे. या देशातील एकात्मता अबाधित राहण्यासाठी आपण सर्वजण एकत्र राहून काँग्रेसचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. काँग्रेसने मागील ७० वर्ष सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन देशाला एकसंघ ठेवण्याचे काम केले. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून काँग्रेसला एक नंबरचा पक्ष म्हणून ओळख निर्माण करून देणे आवश्यक असल्याचे मत प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी यावेळी केले.यावेळी बोलताना माजी मंत्री मधुकरराव चव्हाण म्हणाले की, काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आत्तापर्यंत देशासाठी खूप काम केले आहे. परंतु सद्यस्थितीत सत्तेचा उपयोग करून काही लोक जाणीवपूर्वक इतर पक्षाच्या लोकांना अडचणीत आणत आहेत. पुढील काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका आहेत. काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव मानणारा पक्ष आहे. त्यामुळे आपण काँग्रेस पक्षाला आणखी बळकट करावे असे आवाहन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले. याच कार्यक्रमात दिपक मुळे, ओम पाटील, वीरभद्र फावडे, संतोष फावडे, कपिल माशाळकर, हणमंत गरड, योगेश गरड, सचिन माळी, महेश कुंभार यांच्या सह अनेक युवकांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी अशोकराव जवळगे, दिलीप भालेराव, प्रकाश आष्टे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी शहराध्यक्ष के. डी. पाटील, विठ्ठल वचने, युवक शहराध्यक्ष हरी लोखंडे, नितीन पाटील, रौफ बागवान, संग्राम पाटील, इस्माईल मुल्ला, रफिक शेख, नजीर सिद्दकी, दत्ता गाडेकर, माणिक चिकटे, राजू माशाळकर, शरणाप्पा कबाडे, सरफराज भोंगळे, प्रकाश होंडराव, तानाजी माटे, बाळू माळी, ब्रम्हानंद पाटील, परमेश्वर चिकटे, मतीन गवंडी, भगवान मक्तेदार यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन मुकेश सोनकांबळे यांनी तर केशव सरवदे यांनी आभार मानले.