Saturday, October 31, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुका काँग्रेसमय केल्याशिवाय आपण स्वस्थ राहणार नाही – काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील

by admin
in राजकीय, लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
काँग्रेस पक्ष हा सर्वधर्म समभाव मानणारा पक्ष आहे. आपण सर्वांनी मिळून काँग्रेसला एक नंबरचा पक्ष म्हणून ओळख निर्माण करून देऊया. या पुढील काळात हा तालुका काँग्रेसमय केल्याशिवाय आपण स्वस्थ राहणार नाही असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले.
लोहारा तालुका काँग्रेस पार्टीच्या वतीने लोहारा शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात रविवारी (दि. १२) कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, माजी जि प उपाध्यक्ष अशोकराव जवळगे, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील, प्रदेश सचिव दिलीप भालेराव, लोहारा पंचायत समितीच्या सभापती हेमलता रणखांब, जिल्हा उपाध्यक्ष दिपक जवळगे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, जि प चे माजी सभापती दत्ता पाटील, लोहारा कृ. उ. बा. समितीचे माजी संचालक शंकर जट्टे, लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील, आबासाहेब साळुंके, उपसभापती व्यंकट कोरे, बुद्धिवंत साखरे यांची प्रमुख उपस्थिती होती.\"\"यावेळी पुढे बोलताना बसवराज पाटील म्हणाले की, आज धर्मधर्मात भांडणे लावायचे काम चालू आहे. या देशातील एकात्मता अबाधित राहण्यासाठी आपण सर्वजण एकत्र राहून काँग्रेसचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. काँग्रेसने मागील ७० वर्ष सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन देशाला एकसंघ ठेवण्याचे काम केले. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून काँग्रेसला एक नंबरचा पक्ष म्हणून ओळख निर्माण करून देणे आवश्यक असल्याचे मत प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी यावेळी केले.\"\"यावेळी बोलताना माजी मंत्री मधुकरराव चव्हाण म्हणाले की, काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आत्तापर्यंत देशासाठी खूप काम केले आहे. परंतु सद्यस्थितीत सत्तेचा उपयोग करून काही लोक जाणीवपूर्वक इतर पक्षाच्या लोकांना अडचणीत आणत आहेत. पुढील काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका आहेत. काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव मानणारा पक्ष आहे. त्यामुळे आपण काँग्रेस पक्षाला आणखी बळकट करावे असे आवाहन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले. याच कार्यक्रमात दिपक मुळे, ओम पाटील, वीरभद्र फावडे, संतोष फावडे, कपिल माशाळकर, हणमंत गरड, योगेश गरड, सचिन माळी, महेश कुंभार यांच्या सह अनेक युवकांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी अशोकराव जवळगे, दिलीप भालेराव, प्रकाश आष्टे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी शहराध्यक्ष के. डी. पाटील, विठ्ठल वचने, युवक शहराध्यक्ष हरी लोखंडे, नितीन पाटील, रौफ बागवान, संग्राम पाटील, इस्माईल मुल्ला, रफिक शेख, नजीर सिद्दकी, दत्ता गाडेकर, माणिक चिकटे, राजू माशाळकर, शरणाप्पा कबाडे, सरफराज भोंगळे, प्रकाश होंडराव, तानाजी माटे, बाळू माळी, ब्रम्हानंद पाटील, परमेश्वर चिकटे, मतीन गवंडी, भगवान मक्तेदार यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन मुकेश सोनकांबळे यांनी तर केशव सरवदे यांनी आभार मानले.

Ad 2
Ad 1
Tags: काँग्रेस (आय)
Previous Post

राष्ट्रवादीची वज्रमूठ कायम – प्रा.सुरेश बिराजदार – कळंब येथील बैठकीत जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांचे प्रतिपादन

Next Post

लोहारा तालुक्यातील माकणी येथे राष्ट्रवादी दिव्यांग सेलच्या शाखेचे उद्घाटन

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

लोहारा तालुक्यातील माकणी येथे राष्ट्रवादी दिव्यांग सेलच्या शाखेचे उद्घाटन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!