वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील भोसगा येथील जि. प. शाळेत मंगळवारी (दि. ५ ) विद्यार्थ्यांना सिड बॉल बनविण्याच्या कृतीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
तालुक्यातील भोसगा येथील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेत सीड बॉल बनवले आहेत. वृक्षाचे महत्व समजून विद्यार्थी नवीन रोपे तयार करण्यासाठी सीड बॉल बनवण्याची कृतीबद्दल शिक्षक एस. के. चिनगुंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आनंददायी व कृतीयुक्त शिक्षणातून विद्यार्थ्यांनी हे सीड बॉल तयार केले. विद्यार्थ्यांना बीज लावण्यापासुन ते परिपूर्ण वृक्ष होईपर्यंतची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वृक्षांचे संवर्धन व जतन करण्याचे फायदे याबद्दल माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वतः सिड बॉल तयार केल्याने त्याचे फायदे त्यांना लक्षात आले.
यावेळी शाळेतील मुख्याध्यापक एम. एम. डोखले, वर्गशिक्षक एस. के. चिनगुंडे, एस. आर. डावरे, एस. एस. भोसले, व्ही. बी. धालगडे, डी. बी. कांबळे आदी उपस्थित होते.