वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय लोहारा येथे बुधवारी (दि.१६) राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पोलिओ लसीकरण मोहीम अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या आरोग्य सेविका सी बी कांबळे तसेच आशा स्वयंसेविका वैशाली कोळी व केराबाई गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टा कासार येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जी व्ही ढोले व प्राथमिक आरोग्य केंद्र कानेगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका बंदीचोडे उपस्थित होते. आरोग्यवर्धिनी केंद्र येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. दिपाली शिंदे, डॉ. पल्लवी गायकवाड, डॉ. अमोल पांढरे, डॉ. गणेश धज, डॉ. संतोष गंभीरे आदीसह आशा सुपरवायझर, कार्यकर्त्या उपस्थित होत्या.