वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील विविध प्रभागातील सिमेंट रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन व लोहारा नगरपंचायत स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अंतर्गत शहरातील शिवाजी महाराज चौकामध्ये सेल्फी पॉइंटचे उद्घाटन आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते शनिवारी (दि. ७) करण्यात आले.
लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक ११, १२, १३ व ९ मध्ये सिमेंट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच लोहारा नगरपंचायत स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अंतर्गत लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सेल्फी पॉइंटचे उद्घाटन आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, युवा नेते किरण गायकवाड, किशोर साठे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, नागन्ना वकील, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे, शिवसेना गटनेत्या सारिका प्रमोद बंगले, अर्थ व बांधकाम सभापती गौस मोमीन, पाणीपुरवठा सभापती मयुरी अमोल बिराजदार, आरोग्य व दिवाबत्ती सभापती सुमन दिपक रोडगे, महिला बालकल्याण सभापती शमाबी आयुब शेख, नगरसेविका कमल राम भरारे, नगरसेविका शामल बळीराम माळी, ज्येष्ठ नेते अभिमान खराडे, नगरसेवक अविनाश माळी, अमिन सुंबेकर, जालिंदर कोकणे, नगर परिषद स्वच्छता निरीक्षक अभिजीत गोरे, युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, ओम कोरे, रोहयो माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, शहर प्रमुख सलीम शेख, शब्बीर गवंडी, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, माजी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी, के.डि.पाटील, बाळासाहेब कोरे, नगरसेवक आरिफ खानापुरे, विजय ढगे, प्रशांत काळे, सरपंच परवेज तांबोळी, हेमंत माळवदकर, शम्मु भोंगळे, वहाब हेडडे, मल्लिनाथ घोंगडे, जिंदावली शेख, सकलेन शेख, गोपाळ गोरे, महमदी हिप्परगे, खुनमिर मोमिन, नगरपंचायतचे कर्मचारी कमलाकर मुळे, बाळु सातपुते, शिवशंकर साखरे, गणेश खाडगावे, उमाकांत सगट, श्रीशैल्य मिटकरी, यांच्यासह शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खरिप पिक विमा २०२० – २१ या प्रलंबित पिक विमा संदर्भात उमरगा, लोहारा तालुक्याचे आ. ज्ञानराज चौगुले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करून पिक विमा मंजुर करुन घेतल्याबद्दल लोहारा नगरपंचायत व शहराच्या वतीने आ. ज्ञानराज चौगुले यांचा सत्कार करण्यात आला.