Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

सालेगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी हुसेन शेख यांची बिनविरोध निवड

admin by admin
04/01/2023
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सालेगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी हुसेन शेख यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
लोहारा तालुक्यातील सालेगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच निवडीसाठी बुधवारी (दि.४) ग्रामपंचायत कार्यालयात नवनिर्वाचित सदस्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. अध्यासी अधिकारी भास्कर बेशकराव यांच्या उपस्थितीत ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी नवनियुक्त सरपंच भाग्यश्री पाटील या होत्या. या सभेसाठी नवनियुक्त सदस्य हुसेन महेबूब शेख, परमेश्वर सुदाम भालेराव, संगीता दादासाहेब बाबर, वैजंता नितीन देशपांडे, शिलाबाई मारुती साळुंके, मनोज फुलचंद देशपांडे, राजश्री श्रावण चेंडके, किरण राजेंद्र पाटील, उज्वलाबाई नामदेव बडूरे उपस्थित होते. सकाळी दहा ते बारा या कालावधीत नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृतीची मुदत होती.

सत्कार

यावेळी उपसरपंच पदासाठी हुसेन शेख यांचा नामनिर्देशन पत्र दाखल झाला. उपसरपंच पदासाठी एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने उपसरपंचपदी हुसेन शेख यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. या सभेसाठी सहाय्यक म्हणून ग्रामसेवक भोरे, तलाठी बेंबळीकर यांनी काम पाहिले. निवडीनंतर सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, आबासाहेब साळुंके, पोलीस पाटील बालाजी मातोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा सरचिटणीस प्रकाश भगत, माजी सैनिक राजेंद्र गुरव, ग्रामपंचायतचे शिपाई बबन बाबर, कमलाकर देशपांडे, संगणक ऑपरेटर अमोल कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य गोपाळ माने, अजगर शेख, संतोष भालेराव, अण्णाराव देशपांडे, विक्रम भालेराव, नितीन देशपांडे, दादासाहेब बाबर, बालाजी मातोळे, जवाहीर भालेराव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: ग्रामपंचायत
Previous Post

कोण होणार उपसरपंच ! लोहारा तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाची आज होणार निवड

Next Post

2 ते 8 जानेवारी पोलीस वर्धापन दिनसप्ताह निमीत्त देशभक्ती गीत गायन

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

2 ते 8 जानेवारी पोलीस वर्धापन दिनसप्ताह निमीत्त देशभक्ती गीत गायन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's