Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयाच्या मेडिकल युनिट च्या माध्यमातून १२६ गावात मिशन कवच कुंडल अभियान सुरु

admin by admin
01/11/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील दि प्राईड इंडिया स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या चार अद्ययावत मोबाईल मेडिकल युनिटच्या माध्यमातून १२६ गावामध्ये “मिशन कवच कुंडल अभियान” सुरु करण्यात आले आहे. या अभियाना अंतर्गत कोव्हीड लसीकरणा संबधी जनजागृती आणि लसीकरण करण्यात येत आहे. या माध्यमातून गावातील पात्र नागरिकांचे १०० टक्के लसीकरण करण्याचे ध्येय ठेवले आहे असे प्रतिपादन स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी केले. स्पर्शचे कार्यक्रम अधिकारी अच्युत आदटराव म्हणाले कि, चार मोबाईल मेडिकल युनिटच्या माध्यमातून लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील गरजू १२६ गावामध्ये ठरलेल्या तारखेला आणि ठरलेल्या वेळेत आरोग्य सेवा सातत्याने देण्यात येते. तसेच “मिशन कवच कुंडल” अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी १२६ गावामध्ये मोबाईल मेडिकल युनिटच्या नियोजित दौऱ्याच्या एक दिवस अगोदर चित्ररथाच्या माध्यमातून लसीकरणासंबंधी जनजागृती करण्यात येत आहे. तर दुसऱ्या दिवशी कोव्हीड लसीकरण आयोजित करण्यात येत आहे.चारही मोबाईल मेडिकल युनिटवर कोव्हीशिल्ड आणि कोवॅक्सीन या दोन्ही लसीचे डोस उपलब्ध करण्यात आलेले आहेत. वाडी,वस्ती व दुर्गम भागातील लोकांना गावातच डोस उपलब्ध झाल्याने व सुविधा निर्माण झाल्याने नागरिकामधून कौतुक होत आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये कोव्हीशिल्ड आणि कोवॅक्सीन या दोन्ही लसीचे एकूण २७४५ डोस देण्यात आले अशी माहिती स्पर्श रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली. मिशन कवच कुंडल अभियान राबवण्यासाठी सर्व ग्रामपंचायत, आशा कार्यकर्ती आणि मोबाईल मेडिकल युनिटचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: मिशन कवच कुंडलस्पर्श रुग्णालय सास्तुर
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक रमेश बारसकर यांच्या अध्यक्षतेखाली लोहारा येथे बैठक संपन्न

Next Post

आरणी ठरले लोहारा तालुक्यातील १०० टक्के नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस देणारे पहिले गाव

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

आरणी ठरले लोहारा तालुक्यातील १०० टक्के नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस देणारे पहिले गाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's