वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरामध्ये स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवा निमित्त हर घर तिरंगा अभियान राबविण्यासाठी लोकसहभाग वाढावा व ध्वजाचा योग्य सन्मान राखुन ध्वज फडकावण्याचे आवाहन करण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचे अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.२) बैठक घेण्यात आली.
या बैठकीसाठी नगरपंचायत क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्यासह शहरातील डॉक्टर, मेडीकल असोसिएशनचे प्रतिनिधी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते. लोहारा शहरामध्ये दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येणार आहे. नगरपंचायतच्या वतीने झेंडा पुरविण्यात येणार आहे. तसेच शहरामध्ये हर घर तिरंगा अभियान यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांसमवेत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शहरामध्ये दि. १० ऑगस्टपासून ध्वज देण्यात येणार आहे. या बैठकीसाठी नगराध्यक्षा वैशाली खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख, मुख्याधिकारी गजानन शिंदे, स्वच्छता निरीक्षक अभिजित गोरे यांच्यासह नगरसेवक, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, डॉक्टर, मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष आदी उपस्थित होते.