लोहारा प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील हराळी येथे भव्य क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची संकल्पना सचिन सूर्यवंशी यांनी दिली. पाणी वापराविषयी जनजागृती व्हावी, मातीचे महत्व युवकांना समजावे व पर्यायी शेतीची आवड निर्माण व्हावी, त्याविषयी गावातील युवकांमध्ये चर्चा, संवाद घडून गावातील पाण्याविषयी युवकांनी पुढाकार घेऊन युवकांनी प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे प्रत्येक टीमने एक वनराई बंधारा बांधणे बंधनकारक आहे असा या स्पर्धेचा नियम आहे. या स्पर्धेसाठी एकूण ४३ संघांनी नोंदणी केली आहे. मंगळवार दि. २२ पासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु.15,555 ( मा. किरण रवींद्रजी गायकवाड), द्वितीय पारितोषिक रु. 11,111 ( मा. दीपक जवळगे ), तृतीय पारितोषिक 7,777 (मा. नेताजी काशीनाथ सूर्यवंशी), मॅन ऑफ द सिरीज रु. 5, 555 ( मा. राहुल दादा पाटील सासूस्तरकर ) , मॅन ऑफ द सिरीज – रु. 5,555 ( प्रणवी मोबाईल सर्व्हिस एण्ड शॉपी) तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यासाठी प्रत्येकी रु. 3,333 अनुक्रमे (मा. रवींद्र दादा पाटील, मा. कालिदास बाबुराव सुर्यवंशी ) ठेवण्यात आले आहेत. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल दादा पाटील, मा. जि. प. सदस्य दीपक जवळगे, सामाजिक कार्यकर्ते सचिन दादा सूर्यवंशी, गणेश जाधव, संभाजी वडजे, दिलीप सूर्यवंशी, मोहन सुर्यवंशी, रवींद्र पाटील, शुभम साठे, अजित सूर्यवंशी, राहुल पाटील, नेताजी सूर्यवंशी, संतोष मोरे, गुड्डू मुल्ला, सूरज सूर्यवंशी, धोंडीराम कांबळे, ज्ञानेश्वर जाधव, शरद सूर्यवंशी, मनोज पाटील, साहिल सय्यद, किशोर सूर्यवंशी, प्रशांत कस्तुरे, विठ्ठल ढोबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले. या स्पर्धेचे आयोजन सचिन दादा मित्र मंडळ हराळी यांच्या मार्फत करण्यात आले असून जिल्ह्यातून यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे.