वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
१९९३ च्या महाप्रलयंकारी भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे गुरुवारी (दि.३०) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.लोहारा तालुक्यातील सास्तुर व परिसरातील गावातील शेकडो नागरिक १९९३ च्या महाप्रलयंकारी भूकंपात मृत्युमुखी पडले होते. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी सास्तुर येथील चौरस्ता येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सास्तुरचे सरपंच यशवंत कासार हे होते. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार, हभप ज्ञानेश्वर महाराज, किशोर साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, नागन्ना वकील, किरण गायकवाड, विजय लोमटे, जालिंदर कोकणे, प्रभारी उपविभागीय अधिकारी राहुल पाटील, तहसीलदार संतोष रुईकर, माकणीचे सरपंच विठ्ठल साठे, होळीच्या सरपंच बिराजदार, पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे, स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, गोविंद साळुंके, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, बालाजी मेनकुदळे, माधवराव पाटील, गटविकास अधिकारी सोपान अकेले, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, शेखर आंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते येथील स्मृतिस्तंभास पुष्पहार अर्पण करून अभिवादन व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर परिसरातील गरजू महिलांना मान्यवरांच्या हस्ते साड्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमाकांत जोशी यांनी केले. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी हा कार्यक्रम शासकीय कार्यक्रम होणेसाठी तसेच भूकंपग्रस्त गावातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, युवा नेते किरण गायकवाड माजी सरपंच माधवराव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या आयोजनात नेहमीच अग्रभागी असणारे महेबूब बागवान यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महेबूब बागवान, सलमान सवार, रब्बानी नळेगावे, विष्णू वाघमारे, शाम हासुरे, शांतेश्वर दलाल, आफताब बागवान, बबलू बागवान, वेणू चिलवेर, लाईकसाहेब कादरी, अलीम केळगावे, गणेश स्वामी आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी सास्तुर, उदतपुर, होळी, राजेगाव, रेबे चिंचोली, कोंडजीगड, मुर्षदपूरसह परिसरातील भूकंपग्रस्त गावातील नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन रावसाहेब सरवदे यांनी केले.