Vartadoot
Monday, May 19, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

कुक्कुटपालक नागरिकांनी बर्ड फ्ल्यूबाबत काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन – भीती बाळगू नये…काळजी घ्यावी…!

admin by admin
13/01/2021
in महाराष्ट्र
A A
0
Ad 10

अलिबाग, जि.रायगड,दि.13 (जिमाका):-

सध्या बर्ड फ्लूबाबतची भीती सर्वत्र पसरलेली दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुभाष म्हस्के आणि जिल्हा पशु विकास अधिकारी डॉ.बंकट आर्ले यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पक्ष्यांमधील बर्ड फ्लू या आजाराविषयीची योग्य ती माहिती समजून घेऊन त्याप्रमाणे काळजी घ्यावी,भीती बाळगू नये, व अफवांवर विश्वास ठेवू नये.

पक्ष्यांमध्ये अचानक मोठया प्रमाणात मर्तृक आढळल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थांना त्वरीत कळवावे. पोल्ट्री फार्म मधील पक्ष्यांचा इतर जंगली पक्षाशी (उदा.बदके, कबूतर, पोपट, चिमण्या, कावळे इ.) संपर्क होणार नाही, याची दक्षता घेणे व जैव सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करणे. कुक्कुटपालकांनी शेड व परिसरामध्ये स्वच्छता बाळगणे. नियमित सोडीयम हायपोक्लोराईड, धुण्याचा सोडा, चुना लावून परिसर निर्जंतुकीकरण करणे. संशयित/प्रादूर्भाव झालेल्या फार्मवरुन पक्ष्यांची वाहतूक, खरेदी विक्री थांबवावी.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी :-

चिकन व अंडी 100 अंश डि.से.वर शिजवूनच खावीत, चिकन स्वच्छ करताना हॅण्ड ग्लोजचा वापर करावा, समाजमाध्यमातून व इतर प्रसारमाध्यमातून प्रसारित होणाऱ्या अफवांपासून सावध राहावे, मांस,अंडी व मासे चांगली शिजवून बिनधास्त खा व निरोगी राहा तसेच अधिक माहितीसाठी www.ahd.maharahstra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.

भीती नको काळजी हवी, हे करा :-

पक्ष्यांच्या स्त्रावासोबत तसेच विष्ठेसोबत संपर्क टाळा, पक्षी, कोंबड्याचे पिंजरे आणि ज्या भांड्यात त्यांना रोज खाणे दिले जाते,अशी भांडी रोज डिटर्जंट पावडरने स्वच्छ धुवा, शिल्लक उरलेल्या मांसाची योग्य विल्हेवाट लावा, एखादा पक्षी मरण पावला तर अशा पक्षाला उघड्या हाताने स्पर्श करु नका, जिल्हा तसेच विभागीय नियंत्रण कक्षाला ताबडतोब कळवा, कच्च्या पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना पाणी व साबणाने आपले हात वारंवार धुवा, व्यक्तिगत स्वच्छता राखा, परिसर स्वच्छ ठेवा, कच्चे चिकन किंवा चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क आणि ग्लोजचा वापर करा, पूर्ण शिजवलेले मांसच खा, आपल्या परिसरात जलाशय किंवा तलाव असतील आणि या तलावात पक्षी येत असतील तर अशी ठिकाणे वन विभाग अथवा पशुसंवर्धन विभागास कळविणे आवश्यक आहे.

हे करु नका:-

कच्चे चिकन किंवा कच्ची अंडी खाऊ नका, अर्धवट शिजलेले मांस/चिकन किंवा अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नका, आजारी दिसणाऱ्या सुस्त पडलेल्या पक्षाच्या संपर्कात येऊ नका, पूर्णपणे शिजलेले मांस आणि कच्चे मांस एकत्र ठेवू नका, असेही आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: बर्डफ्लु
Previous Post

बाळासाठी आईचा कराेनाशी लढा…!

Next Post

उस्मानाबाद येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय महाविद्यालय होणार – महाविद्यालयाला संलग्न होणार ४३० खाटांचे रुग्णालय – मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Related Posts

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

12/05/2025
चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

06/05/2025
उमाकांत सूर्यवंशी यांची महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून गुणवंत कर्मचारी म्हणून निवड
महाराष्ट्र

उमाकांत सूर्यवंशी यांची महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून गुणवंत कर्मचारी म्हणून निवड

17/04/2025
विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन
मराठवाडा

विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन

05/04/2025
हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी
मराठवाडा

हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

04/01/2025
लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?
आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

19/12/2024
Next Post

उस्मानाबाद येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय महाविद्यालय होणार - महाविद्यालयाला संलग्न होणार ४३० खाटांचे रुग्णालय - मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

498550

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!