Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

उस्मानाबाद येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय महाविद्यालय होणार – महाविद्यालयाला संलग्न होणार ४३० खाटांचे रुग्णालय – मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

by admin
in आपला जिल्हा, महाराष्ट्र
A A
0

मुंबई –

उस्मानाबाद येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याला संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय निर्माण करणेबाबत दि. १३ जानेवारी ला झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला आहे. या निर्णयाबद्दल उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

 

उस्मानाबाद येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणे तसेच 430 खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

या प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी एकूण रुपये 674.14 कोटी (अनावर्ती खर्च सुमारे रूपये 429.63 कोटी व आवर्ती खर्च सुमारे रूपये 244.51 कोटी) इतका निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच आवश्यक तेवढी पदनिर्मिती करण्यास आणि पदे भरण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे.

नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकरिता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील जिल्हा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय आणि क्षय रुग्णालय स्थावर जंगम मालमत्तेसह तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास निशुल्क वापरास उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

याशिवाय हे वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय सार्वजनिक खाजगी भागिदारी (PPP) तत्वावर स्थापन करण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली आहे.

 

आज बुधवार, दि. १३ जानेवारी २०२१ च्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय –

• जळगाव जिल्ह्यातील हतनूर, शेळगाव, वरणगाव तळवेल या 3 प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता

• धरण पुनर्स्थापना व सुधारणा प्रकल्प टप्पा-2 व 3 अंतर्गत समाविष्ट प्रकल्पांच्या कामांना प्रशासकीय मान्यता आणि निविदा प्रक्रियेस मान्यता

• बाल न्याय मंडळाच्या बैठक व प्रवास भत्ता वाढ करणे व बालगृह/निरीक्षण गृह, खुले निवारागृह आणि विशेष दत्तक संस्थेतील बालकांच्या परिपोषण अनुदानात वार्षिक ८ टक्के वाढ

• महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर खासगी कौशल्य विद्यापीठ स्थापन करणे व कार्यपध्दतीसाठी मार्गदर्शक सूचना व मॉडेल विधेयकास मान्यता

उस्मानाबाद येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याला संलग्न 430 खाटांचे रुग्णालय निर्माण करणे

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिनियम 1998 मध्ये सुधारणा

जनसंपर्क कक्ष ( मुख्यमंत्री सचिवालय) यांच्याकडील माहिती

Ad 2
Ad 1
Tags: Osmanabad Medical College
Previous Post

कुक्कुटपालक नागरिकांनी बर्ड फ्ल्यूबाबत काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन – भीती बाळगू नये…काळजी घ्यावी…!

Next Post

आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!