उस्मानाबाद :
ढोकी येथील वसंतराव काळे महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख व राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ.बाळासाहेब वैजनाथ मैंद यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या उस्मानाबाद जिल्हा समन्वयक पदी नुकतीच निवड केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे सचिव मा.आ. विक्रमजी काळे, संस्थेचे उपाध्यक्ष मा.प्र.कुलगुरू मधुकरराव गायकवाड, संस्थेचे कोषाध्यक्ष मा. प्राचार्य श्री. अनिलजी काळे, आदरणीय गुरुवर्य डॉ.आर.एस. सोळुंके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास फेरे व सर्व स्टाफ आणि मित्र परिवारांनी विशेष अभिनंदन केले.