धाराशिव जिल्हातील अतिवृष्टी बाधीत तसेच नदीकाठालगत असलेल्या गावांमध्ये पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी गेल्याने जिवनावश्यक वस्तुचे फार मोठे नुकसान झालेले असताना पुणे मुंबई येथील अनेक कंपन्या व सेवाभावी संस्था मदतीसाठी पुढे सरसावलेल्या पहायला मिळत आहेत.
आपत्तीबाधीत कुटुंबाची तात्पुरती सोय व्हावी या उद्देशाने साॅफ्टग्रिप या सोलार कंपनीच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तु तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत ही मदत करण्यात आली. यावेळी जानकापुर सज्जाचे तलाठी किशोर उंदरे, हातोला सज्जाच्या तलाठी प्रिया कास्तुरे, उदय मनगिरे, चंद्रहर्ष जाधव, ज्ञानेश्वर जाधव, अरुण जाधव, मजहर शेख, मंगेश जाधव, प्रविण माने यांचे सहकार्य लाभले. अतिवृष्टी व पुरग्रस्तबाधीत वाशी तालुक्यातील जानकापुर, जेबा, हातोला आणि पारगाव या गावांना हे जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले आहे.












