वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
तांडा, वस्ती वाडीवरील शाळा बंद करू नका अशी मागणी उमरगा येथील समविचारी संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. उमरगा तहसीलदार यांना हे निवेदन देण्यात आले.
उमरगा येथील महिला राजसत्ता आंदोलन, महाराष्ट्र लोक विकास मंच, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, आणि वंचित बालविकास मंचच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. वस्ती शाळा तांड्यावरील पट कमी असल्याच्या कारणावरून शासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय मागे घ्यावा म्हणून वरील संघटनेच्या मार्फत उमरगा येथील तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर महिला राजसत्ता आंदोलन जिल्हाध्यक्षा विद्याताई वाघ, जिजाऊ ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्षा सुनंदाताई माने, महाराष्ट्र लोक विकास मंचचे उपाध्यक्ष भूमिपुत्र वाघ, वंचित बालविकास मंच उपाध्यक्षा रंजिता पवार, प्रेम राठोड, राज्य समन्वयक ऊसतोड कामगार संघटना निखिल वाघ, जिजाऊ ब्रिगेड प्रवक्त्या रेखाताई सूर्यवंशी, मराठा सेवा संघ शहराध्यक्ष अनिल सगर, जिजाऊ ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्षा रेखाताई पवार, शामलताई पाटील, सोबत कृष्णा पाटील, प्रशांत ढवळे, विद्या मार्कड, गोविंद कामले, सुजल दरवेश, प्रशांत ढवळे यांच्यासह तालुक्यातील नारंगवाडी, तुरोरी, मुरूम, कदेर आदी गावातील शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.