उमरगा :
भारत शिक्षण संस्था संचलित तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी येथे पालक मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य कवलजीत बिराजदार यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्राचार्य बिराजदार म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता व सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष देऊन विद्यार्थ्यांची प्रगती विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये समन्वय साधण्याच्या व शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच महाविद्यालयाची सोयसुविधा, विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या कमिट्या याविषयी मार्गदर्शन केले. प्राध्यापक सुरज भगत यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी प्रा. पूजा भावे, प्रा. राजश्री जाधव, प्रा. दीपाली भगत, प्रा. स्नेहल चनशेट्टी, प्रा. अभिलाषा हांडे, प्रा. प्रीती मोरे, संगमेश मंठाळकर, शाम मुगळे, अभंग शिंदे, आकाश सूर्यवंशी, गणेश वाघमोडे, संदीप माने, वैभव मोरे, अभिमन्यू कांबळे, सुहास गायकवाड, अभिजीत माने, दिनेश राठोड, किशोर गायकवाड आदींसह पालक उपस्थित होते.