वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या वतीने उमेद महिला बचत गटांची चळवळ अधिक यशस्वी व गतिमान करणे व महिलांचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय विकास करून त्यांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने दि. 8 मार्च ते 5 जून या कालावधीत सुरू करण्यात आलेल्या महा समृद्धी महिला सक्षमीकरण अभियानाची तालुकास्तरीय कार्यशाळा पंचायत समिती सभापती राधा बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थिती त पंचायत समिती सभागृह निलंगा येथे शुक्रवारी ( दि.19 ) आयोजित करण्यात आली.
महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून संघटित होऊन ग्रामविकासात मोलाचा हातभार लावुन शासनाच्या सर्व योजनांचा लाभ या अभियान कालावधीत घ्यावा व अभियान यशस्वी करावे असे आवाहन सभापती राधा बिराजदार यांनी उपस्थित महिलांना केले.
अभियानाचा दहा कलमी कार्यक्रम काय व तो कशा पद्धतीने राबवावा तसेच विविध शासकीय योजना यांचा कृतीसंगम साधून महिलांनी आपली उपजीविका मजबूत करावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन लतालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश यांनी केले. प्रारंभी शरद समुखराव यांनी अभियानाचा उद्देश व रूपरेषा याची माहिती दिली. सदर कार्यशाळेचे यशस्वी नियोजन गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या कार्यशाळेचे यशस्वी नियोजन करण्यासाठी तालुका व्यवस्थापक अरुण शाहीर व सर्व प्राभाग समन्वयक यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेला तालुक्यातील सीआरपी, कृषी सखी, पशु सखी, आर्थिक साक्षरता सखी, सिटीसी उपस्थित होत्या.