Saturday, October 31, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

महाराष्ट्रातील 3 विद्यालयांना ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार’

by admin
in ब्रेकिंग, महाराष्ट्र
A A
0

नवी दिल्ली, दि. 21: स्वच्छ विद्यालयांसाठी ठरवून दिलेल्या विविध मानकांवर पात्र ठरणा-या महाराष्ट्रातील तीन विद्यालयांना वर्ष 2021-22 च्या ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने शनिवारी ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कारा’ चे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंह यांच्यासह केंद्रीय शिक्षण विभागाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील तीन विद्यालयांची निवड स्वच्छ विद्यालय पुरस्कारांसाठी करण्यात आली यामध्ये सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील ओझरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, याच जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पाटण व्हॅली इंग्ल‍िश मिडीयम स्कूल आणि रायगड जिल्ह्यातील खारघर येथील रामशेठ पब्ल‍िक स्कूल या विद्यालयांना ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रातिनिध‍िक म्हणून त्या-त्या शाळेंचे विद्यार्थीही पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्राचार्यांसोबत उपस्थित होते. या पुरस्कारातंर्गत विद्यालयांचे सहा मानकांवर मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये पाणी, शौचालय, हाथ धुण्यासाठी साबण, संचालन व देखभाल, व्यवहार परिवर्तन व क्षमता निर्माण आणि कोविड-19 च्या काळातील तयारी व प्रतिक्रिया या आधारावर विद्यालयांचे मुल्यांकन झाले.

\"\"

केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे वर्ष 2016-17 पासून स्वच्छता विद्यालय पुरस्कारांची सुरूवात करण्यात आली. वर्ष 2021-2022 च्या स्वच्छ विद्यालय पुरस्कारांसाठी देशभरातील एकूण 39 शाळांची निवड झाली. यामध्ये सर्वसमावेशक श्रेणीमध्ये 34 विद्यालयांची निवड तर उपश्रेणींमध्ये 5 विद्यालयांची निवड करण्यात आली. या अंतर्गत 17 प्राथमिक आणि 22 माध्यमिक/उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश आहे. तसेच निवड झालेल्या विद्यालयांमध्ये 21 शाळा ग्रामीण भागातील तर 18 शाळा या शहरी भागातील आहे. या विद्यालयांमध्ये 28 शाळा अनुदान‍ित, 11 शाळा खाजगी, 2 कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय, 1 नवोदय विद्यालय आणि 3 केंद्रीय विद्यालयांचा समावेश आहे. सर्व समावेशक श्रेणीमधील 34 विद्यालयांना 60 हजार रूपये रोख तर उपश्रेणीतील 5 विद्यालयांना 20 हजार रूपये रोख तसेच प्रशस्ती पत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

Ad 2
Ad 1
Tags: स्वच्छ विद्यालय
Previous Post

भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्यास विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांची भेट – इथेनॉल व वीजनिर्मिती युनिटचे भूमिपूजन संपन्न

Next Post

अनैतिक देह व्यापार करणाऱ्या 3 हॉटेल-लॉजवर छापे – १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Related Posts

महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

महाराष्ट्र

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

महाराष्ट्र

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Next Post

अनैतिक देह व्यापार करणाऱ्या 3 हॉटेल-लॉजवर छापे - १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!