वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने संचारबंदी लावली आहे. तरीही नागरिक काही तरी कारणे सांगत घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामुळे ही रुग्ण संख्या कमी करण्यासाठी, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा एकदा लॉक डाऊन लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या बुधवारी (दि. 21) निर्णय जाहीर करण्याची दाट शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत सर्व जिल्ह्यातील रुग्णालयात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी काही दिवसांपूर्वी राज्यात संचारबंदी लागू केली होती. तरीही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहेत. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी ( दि. 20) मंत्रिमंडळाची बैठक झाली. तसेच सध्याची परिस्थिती पाहता कडक निर्बंधांऐवजी लॉकडाऊन हाच पर्याय असल्याने सर्वच मंत्री महोदयांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर सांगितले. त्यामुळे राज्यात परत एकदा कडक लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.