Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लुटीतील मोबाईल फोनसह डिझेल चोरणारे आरोपी अटक

by admin
in ब्रेकिंग
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
स्थानिक गुन्हे शाखा : फडका, ता. भुसावळ येथील- मनिषा किशोर पाटील ह्या दि 25.03.2023 रोजी 08.20 ते 08.30 वा. सु. त्यांचे गावी भुसावळ येथे जाण्यासाठी तुळजापूर बसस्थानक येथुन मलकापूर बसमध्ये चढत असताना अज्ञात स्त्रीने गर्दीचा फायदा घेत मनिषा यांचे नकळत त्यांच्या हातातील पर्स मधील रोख रक्कम 6,000 ₹, मोबाईल फोन व पॅन कार्ड, आधार कार्ड, असा एकुण 11,000 ₹ किंमतीचा माल जबरीने लुटून पसार झाली होती. अशा मजकुराच्या मनिषा पाटील यांनी दि.25.03.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392 अंतर्गत गुन्हा क्र. 112/2023 हा नोंदवला आहे. सदर गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन तुळजापूर बसस्थानक येथुन चोरीस गेलेला मोबाईल फोन व रोखरक्कम ही महिला नामे मिनाक्षी उमेश भोसले रा. साठेनगर उस्मानाबाद हिने चोरुन नेले असुन ती सध्या तिच्या राहत्या घरी आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाले वरुन आम्ही स्टाफसह बातमीच्या ठिकाणी जावून महिला नामे मिनाक्षी उमेश भोसले, वय 32 वर्षे रा. साठेनगर हीस राहत्या घरातून नमूद लुटीतील मालापैकी मोबाईल फोन, रोख रक्कम व इतर कागद पत्र असा एकुण- 9,000 ₹ किंमतीच्या मालासह ताब्यात घेऊन पुढील कारवाईस्तव तुळजापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.
तसेच भोसले हायस्कुल, धाराशिव येथील- बसचालक-धनंजय कुंडलिक बिटे हे दि. 21.03.2023 रोजी 11.00 ते दि.22.03.2023 रोजी 05.30 वा पुर्वी तेर बसस्थानक येथे बस उभी केली असता बसमधील अंदाजे 13020 ₹ किंमतीचे डिझेल 140 लि. तसेच तेर येथील -विकास रामकृष्ण भोरे यांच्याही टेम्पो मधील अंदाजे 4,650 ₹ किंमतीचे डिझेल 50 लि.अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले होते. अशा मजकुराच्या धनंजय बिटे यांनी दि. 22.03.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत ढोकी पो.ठा. गुरनं 115/2023 गुन्हा नोंदवला आहे. सदर गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन ईसम नामे विशाल ऊर्फ भांमड्या प्रकाश बालाजी काळे रा. कन्हेरवाडी, ता. कळंब हा मस्सा येथे उभा आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने आम्ही लागलीच स्टाफसह सदर बातमी मिळालेल्या ठिकाणी आलो असता तेथे एक इसम चारचाकी गाडी जवळ दिसला त्यास त्याचे नाव गाव व त्याचे ताब्यातील गाडी बाबत विचारले असता सदरची गाडी ही माझ्या मालकीची आहे असे सांगुन त्याने त्याचे नाव- विशाल ऊर्फ भांमड्या प्रकाश बालाजी काळे रा. कन्हेरवाडी, ता. कळंब असे सागिंतले.त्याच्या कडे अधिक चौकशी केली असता त्याने सागिंतले की, मी व माझे साथीदार श्याम ऊर्फ आप्पा अजिनाथ शिंदे, रा. मांडवा, ता. कळंब, रामा शंकर काळे, रा. कन्हेरवाडी, ता. कळंब यांनी मिळून तेर येथील बसस्थानक मध्ये उभी असलेल्या बस मधील व तेरचे रस्त्यावरील टेम्पो मधील डिझेल चोरी केलेले आहे अशी कबुली दिली. यावरुन ढोकी पो.ठा. गुरनं 115/2023 भा. द. सं. कलम 379 मुद्देमाल 70 लि. डिझेल दोन कॅन्ड सह आनंदनगर पो.ठा. येथील गु.रं.नं 93/2022 कलम 379 मधील डिझेल विकून मिळालेले रोख रक्कम 5,200 ₹ व गुन्ह्यात वापरलेली ईडीको गाडी सह असा एकुण 1,61,500 ₹ किंमतीच्या मालासह ताब्यात घेऊन पुढील कारवाईस्तव पोलीस ठाणे ढोकी, आनंदनगर व उमरगा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन स्थागुशा च्या पोनि- श्री. यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि- श्री. मनोज निलंगेकर, सफौ-काझी, पोलीस हावलदार- सय्यद, औताडे, काझी, पठाण, पोलीस अंमलदार- रविंद्र आरसेवाड, महिला पोलीस अंमलदार- राठोड, चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.

Ad 2
Ad 1
Tags: स्थानिक गुन्हे शाखा
Previous Post

भातागळी येथील शिवशंभो महादेवाच्या यात्रेनिमित्त राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन

Next Post

चकवा – मराठी भयकथा – मराठवाड्यातील प्रसिद्ध ग्रामीण कथाकार कलीम तांबोळी यांची ही भयकथा नक्की वाचा

Related Posts

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आरोग्य व शिक्षण

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आपला जिल्हा

अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला

ब्रेकिंग

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

आपला जिल्हा

माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांचे निधन

Next Post

चकवा - मराठी भयकथा - मराठवाड्यातील प्रसिद्ध ग्रामीण कथाकार कलीम तांबोळी यांची ही भयकथा नक्की वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!