लोहारा / प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील जेवळी येथील धनराज बिराजदार यांची संभाजी ब्रिगेड च्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष ऍड. तानाजी चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे लोहारा तालुका उपाध्यक्ष किरण सोनकांबळे, सचिव बालाजी यादव, कोषाध्यक्ष अविनाश मुळे, तालुका संघटक प्रणिल सुर्यवंशी, दौलत पवार, विठ्ठल औरादे, राहुल सुरवसे, समित कोठमाळी, ज्ञानेश्वर भोजराव, अमोल बिराजदार आदिसह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.