Saturday, October 17, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यातील माकणी सोसायटी निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने मारली बाजी

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी विविध कार्यकारी सेवा सहकारी  संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी रविवारी (दि. ३) मतदान झाले. एकूण १३ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने ९ जागेवर विजय मिळवला आहे.
या सेवा संस्थेसाठी रविवारी (दि. ३) सकाळी आठ ते चार या वेळेत मतदान पार पडले. माकणीसह करजगाव व काटेचिंचोली गावातील एकूण १०३४ मतदार होते. एकूण तेरा जागेसाठी झालेल्या या निवडणुकित खुल्या वर्गासाठी आठ, महिलासाठी दोन, इतर मागास प्रवर्ग एक, अनुसुचित जाती जमाती एक, भटक्या विमुक्त प्रवर्गासाठी एक जागा आरक्षित होती. माकणी हे लोहारा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाचे गाव आहे. त्यातच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या दृष्टीने या निवडणूकीला अधिक महत्व आले होते.

\"\"

त्यामुळे या निवडणूकीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. त्यातच तिन्ही गावातील मातब्बर पुढाऱ्यांनी या निवडणुकित प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. श्री माकणाई सहकार विकास पॅनल व शेतकरी विकास पॅनल या दोन पॅनलमध्ये चुरशीची लढत झाली. यावेळी ९६३ मतदारानी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर लगेच मतमोजणी पार पडली. यात शेतकरी विकास पॅनलने १३ पैकी ९ जागेवर विजय मिळवत सेवा संस्थेवर वर्चस्व मिळवले. तर श्री. माकणाई सहकार विकास पॅनलने ४ जागेवर विजय मिळवला.

\"\"

निकाल जाहीर होताच शेतकरी विकास पॅनलच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. एन. विभूते व गटसचिव यशवंत कांबळे यांनी निवडणुकीचे काम पाहिले.

Tags: माकणीलोहारासोसायटी निवडणूक
Previous Post

उमरगा येथील तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये निरोप समारंभ संपन्न

Next Post

रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता ? – लोहारा ते करजखेडा रस्त्यावरील उर्वरित काम तात्काळ करण्यात यावे – प्रवासी व वाहनधारकातून होत आहे मागणी

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता ? - लोहारा ते करजखेडा रस्त्यावरील उर्वरित काम तात्काळ करण्यात यावे - प्रवासी व वाहनधारकातून होत आहे मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!