Saturday, October 31, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता ? – लोहारा ते करजखेडा रस्त्यावरील उर्वरित काम तात्काळ करण्यात यावे – प्रवासी व वाहनधारकातून होत आहे मागणी

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मागील दोन तीन महिन्यांपूर्वी लोहारा ते करजखेडा रस्त्याचे काम करण्यात आले आहे. परंतु सदरील रस्त्याचे काम अर्धवट सोडण्यात आले आहे. या रस्त्याच्या काही भागाची अत्यंत दुरवस्था झालेली असतानाही त्याठिकाणी काम करण्यात आले नाही. त्यामुळे या ठिकाणी लहान मोठे अपघात होत असल्याचे दिसून येत आहे.
लोहारा ते करजखेडा या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले होते. मागील दोन तीन महिन्यांपूर्वी या १२ किमी रस्त्यापैकी बहुतांश रस्ता दुरुस्त करण्यात आला आहे. परंतु अद्याप जवळपास ४ किमी रस्त्याचे काम झालेले नाही. या चार किमी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. तरीही हा रस्ता दुरुस्ती चे काम का केले जात नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या रस्त्यावरील खड्यांमुळे लहान मोठे अपघात घडत आहेत. तरीही प्रशासनाला जाग येत नसल्याने या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांतून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.\"\"
लोहारा करजखेडा या रस्त्याची अवस्था मागील दोन तीन वर्षांपासून अत्यंत दयनीय झाली होती. रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता हेच समजत नव्हते. त्यामुळे वाहनधारकांना एक खड्डा चुकवल्यानंतर दुसरा खड्डा चुकवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. या रस्त्यावर सतत दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. लोहारा शहरातून लातूर, उस्मानाबाद, सोलापूर करिता जाण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या खराब रस्त्यामुळे प्रवासी वैतागून गेले होते. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी अनेकदा आंदोलने झाली. त्यानंतर जाग आलेल्या प्रशासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. काम सुरू झाल्याने प्रवासी व वाहनधारकातून समाधान व्यक्त करण्यात येत होते.

\"\"

परंतु लोहारा शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या मार्डी गावापर्यंत दुरुस्ती करण्यात आली. तर त्यापुढे करजखेडा गायरान वस्तीपर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. तसेच करजखेडा गायरान वस्तीपासून पुढे करजखेडा चौरस्त्या पर्यंत चे काम करण्यात आले. विशेष म्हणजे मार्डी गावच्या पुढून करजखेडा गायरान वस्तीपर्यंतच्या रस्त्याचीच मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. तरीही याच रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने उर्वरित रस्त्याचे तात्काळ करावे अशी मागणी प्रवासी व वाहनधारकातून केली जात आहे.

Ad 2
Ad 1
Previous Post

लोहारा तालुक्यातील माकणी सोसायटी निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने मारली बाजी

Next Post

शशिकांत मक्तेदार यांची बुद्धिबळ कोच म्हणून निवड झाल्याबद्दल अष्टविनायक क्लासेसच्या वतीने सत्कार

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

शशिकांत मक्तेदार यांची बुद्धिबळ कोच म्हणून निवड झाल्याबद्दल अष्टविनायक क्लासेसच्या वतीने सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!