लोहारा प्रतिनिधी
लोहारा येथील किंग कोब्रा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत लोहारा शहरातील किंग कोब्रा क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवून प्रथम पारितोषिक पटकाविले. या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक औसा येथील संघाने तर तृतीय पारितोषिक लोहारा इंडियन्स संघाने पटकाविले.
लोहारा येथील किंग कोब्रा मित्र मंडळाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत फक्त ४ – ४ षटकाचे सामने होते. या स्पर्धेतील अंतिम सामना मंगळवारी (दि.२९) लोहारा शहरातील हायस्कुल लोहारा शाळेच्या मैदानावर किंग कोब्रा व औसा येथील अजय बॅटरीज या संघात झाला. या सामन्यात किंग कोब्रा संघाने विजय मिळवला. अंतिम सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी मैदानावर मोठी गर्दी केली होती. पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी दिपक मुळे, अमीन सुंबेकर, नेताजी शिंदे, अमोल बिराजदार, रियाज खडीवाले, असलम खानापुरे, स्वप्नील माटे, गिरीश भगत, सुलेमान सौदागर यांची उपस्थिती होती. यावेळी अंतिम सामन्यातील विजेत्या किंग कोब्रा संघांस १५ हजार व चषक, उपविजेत्या औसा संघास ११ हजार व चषक, तर तिसऱ्या विजेत्या लोहारा इंडियन्स संघास ७ हजार व चषक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी मालिकावीर म्हणून सुवन डोकडे, उत्कृष्ठ फलंदाज ऋषी आदटराव व बाला (विभागून), उत्कृष्ठ गोलंदाज म्हणून शुभम नेमके व भरत (विभागून), उत्कृष्ठ यष्टीरक्षक म्हणून सुनील शिंदे, सलग तीन विकेट लक्ष्मण शिवराय यांनाही वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेदरम्यान पंच म्हणून गोपाळ सुतार, सचिन भोसले, भिमाशंकर डोकडे, सतीश ढगे, ईश्वर बिराजदार, प्रसाद जट्टे आदींनी काम पाहिले. या स्पर्धेसाठी ओम पाटील, सतीश ढगे, गोपाळ सुतार, सुवन डोकडे, सुनील शिंदे, स्वप्नील स्वामी, शंभू स्वामी, गिरीश जट्टे, ईश्वर बिराजदार, परमेश्वर मुळे, राजपाल वाघमारे, चेतन पवार, मनोज लोहार, ओंकार जट्टे, मैनुदिन मोमीन, गौस मोमीन, अनिल यल्लोरे, अक्षय पवार, महेश चपळे आदी युवकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन भीमाशंकर डोकडे यांनी केले.
अंतिम सामना झाला रोमहर्षक
किंग कोब्रा व औसा संघात सहा ओव्हरचा अंतिम सामना झाला. प्रथम फलंदाजी करत औसा संघाने ५७ धावा केल्या. विजयासाठी ५८ धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या किंग कोब्रा संघाचा ओपनर फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद झाला. तरीही किंग कोब्रा संघातील इतर फलंदाजांनी उत्कृष्ठ फलंदाजी करत शेवटच्या षटकात हा सामना जिंकला.