वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त लोहारा शहरातील जयंती उत्सव समितीच्या वतीने सोमवारी (दि.२४) शहरातून भव्य मिरवणुक काढण्यात आली होती. यावेळी मिरवणुकीत कोकण येथील हालत्या देखाव्याने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते.
महात्मा बसवेश्वर महाराज जयंती निमित्त शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. जयंती उत्सव समितीच्या वतीने सोमवारी (दि.२४) सायंकाळी ६ च्या सुमारास या मिरवणुकीस सुरुवात झाली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मान्यवरांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी मंत्री बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक सातलींग स्वामी, माजी जि. प. सदस्य दिपक जवळगे, नागन्ना वकील, शंकर जट्टे, दत्ता बिराजदार, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष ओम पाटील, उपाध्यक्ष वीरभद्र फावडे, सचिव गणेश पालके, के. डी. पाटील, जालिंदर कोकणे, अभिमान खराडे, ओम कोरे, अमोल बिराजदार, आयुब शेख, प्रशांत काळे, विजयकुमार ढगे, अविनाश माळी, दिपक मुळे, जगदीश लांडगे, रघुवीर घोडके, हरी लोखंडे, सलीम शेख, बालाजी माशाळकर, प्रभाकर बिराजदार, ऍड. राजू माशाळकर, कैलास माणिकशेट्टी, राजू जट्टे, माधव वकील, नाना पाटील, बालाजी मक्तेदार यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते.
या मिरवणुकीत कोकण येथील हालत्या देखाव्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. आठ ट्रॅक्टर ट्रॉलीच्या माध्यमातून या मिरवणुकीत हालता देखावा करण्यात आला होता. शहरात प्रथमच हा हालता देखावा आयोजित केल्याने शहरवासीय मोठ्या संख्येने ही मिरवणुक पाहण्यासाठी आले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेली ही मिरवणुक शिवनगर पर्यंत काढण्यात आली. या मिरवणुकीत युवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही मिरवणुक पाहण्यासाठी महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही मिरवणुक यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष ओम पाटील, उपाध्यक्ष वीरभद्र फावडे, सचिव गणेश पालके, मिरवणुक प्रमुख अमोल बिराजदार, ओम कोरे, संतोष फावडे, नागेश जट्टे, मल्लिनाथ घोंगडे, बसवराज पाटील, विठ्ठल वचने, माणिक चिकटे, शिवण काडगावे, शाम नारायणकर, कपिल माशाळकर, सचिन माळी, सचिन तोडकरी, महेश कुंभार, रामेश्वर वैरागकर, महेश पाटील, वैजिनाथ माणिकशेट्टी, किरण तोडकरी, परमेश्वर माशाळकर, मुन्ना माशाळकर आदींसह युवकांनी परिश्रम घेतले.