लोहारा शहरातील नगरसेवक अमीन सुंबेकर यांचा शेख कुटूंबाच्या वतीने सत्कार

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील नगरसेवक हाजी अमीन सुंबेकर हे दि. २० रोजी लोहारा येथुन हज यात्रा २०२२ साठी रवाना होत असल्याने शहरातील अब्बास शेख कुटूंबाच्या वतीने शनिवारी (दि.१८) सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रथमत हाजी अमीन सुंबेकर यांचा रितीरिवाजानुसार गुलपोशी करण्यात आले. त्यानंतर त्यांचा सत्कार करून हज यात्रेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शाह हुसेन कादरी, आदमशा फकीर, हाजी रशीदसाब शेख, शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख, माजी.ग्रामपंचायत सदस्य महेबूब गवंडी, नजीर सिद्दीकी, महेबूब पठाण, गणेश खबोले, अब्बास शेख, यशवंत भुसारे आदी उपस्थित होते.

Related Posts

Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *