वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरात महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती शनिवारी (दि.२२) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
शहरातील महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त शनिवारी (दि.२२) महात्मा बसवेश्वर मंदिरात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात मान्यवरांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक अजित चिंतले, जेष्ठ नागरिक नागन्ना वकील, शंकर जट्टे, दत्तात्रय बिराजदार, अभिमान खराडे, दयानंद गिरी, के.डी. पाटील, विक्रांत संगशेट्टी, आयुब शेख, विजय ढगे, अविनाश माळी, दत्तात्रय फावडे, हरी लोखंडे, प्रशांत काळे, विकास घोडके, नाना पाटील, श्रीकांत भरारे, अनिल जट्टे, जालिंदर कोकणे, दिपक रोडगे, मल्लिनाथ जट्टे, दिपक मुळे, बलभीम पाटील, प्रकाश भगत, प्रमोद बंगले, शिवानंद माशाळकर, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष ओम पाटील, उपाध्यक्ष वीरभद्र फावडे, सचिव गणेश पालके, अमोल बिराजदार, ओम कोरे, दयानंद पोतदार, संतोष फावडे, नागेश जट्टे, शाम नारायणकर, कपिल माशाळकर, सचिन तोडकरी, महेश कुंभार, प्रताप घोडके, महेश पाटील, गौस मोमीन, वैजिनाथ माणिकशेट्टी, दगडू तिगाडे, मल्लिनाथ बनशेट्टी, सचिन कोळी, प्रकाश पाटील, किरण तोडकरी, परमेश्वर माशाळकर आदींसह नागरिक उपस्थित होते.
जयंतीनिमित्त जयंती उत्सव समितीच्या वतीने सोमवारी (दि.२४) भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या कोकण येथील भव्य हालते देखाव्याचे मुख्य आकर्षण राहणार आहे.