वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ, लातूरद्वारा संचलित सास्तुर येथील निवासी दिव्यांग शाळा, श्री शांतेश्वर दिव्यांग व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र व महाराष्ट्र अपंग कामगार संघ लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ एप्रिलला सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेच्या प्रांगणात राज्यस्तरीय दिव्यांग वधू-वर सुचक मेळावा घेण्यात आला.
या मेळाव्यासाठी धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, बीड, सांगली, पुणे, बारामती, सोलापूर, अकोला, अमरावती यासोबतच बसवकल्याण, भालकी, बिदर, आळंद या महाराष्ट्र-कर्नाटक सिमावर्ती भागातूनही मोठ्या संख्येने उपवर वधू-वर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यासाठी १५६ उपवर मुले व २३ मुली सहभागी झाल्या होत्या. दिव्यांग प्रवर्गातही विवाह इच्छुक मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण खूपच कमी असल्याचे सदर मेळाव्यातून प्रकर्षांने जाणवले. मेळाव्यात पाच दिव्यांगांना आपल्या आयुष्याचे जोडीदार मिळाले आहेत. ज्यांना आयुष्याचे जोडीदार मिळाले आहेत. त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या मेळाव्याच्या प्रारंभी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर येथील उद्योजक शामसुंदर सोनी हे होते. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहूल पाटील, समाज कल्याण विभाग लातूरचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवशटवार, दिव्यांग कायदा २०१६ गोवा राज्य कमिटी सदस्य प्रकाश कामत, राधेश्याम वर्टी, स्पर्श ग्रामीण रूग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस लोहारा तालुकाध्यक्ष सुनिल साळूंके, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील समाजकार्य विभागाच्या प्राध्यापक विद्या हातोलकर, श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बी.आर.बदामे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे, सर्वोदय सेवाभावी संस्था भूमचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप डोके, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा जिल्हा उपाध्यक्ष विष्णूदास तोष्णीवाल, महाराष्ट्र अपंग कामगार संघाचे अध्यक्ष उस्ताद शफोद्दीन, सास्तूरचे उपसरपंच मिथुन कुर्ले, जिजाऊ ब्रिगेडच्या रेखाताई पवार, माने, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष शौकत मासुलदार, उदतपूर माजी सरपंच माधवराव पाटील, एकल महिला पुनर्वसन मंचाचे विजय काका जाधव, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष पंडीत जळकोटे, प्रहार तालुकाध्यक्ष महंमद हानिफ अत्तार, राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल लोहारा तालुकाध्यक्ष लक्ष्मण बिराजदार, दिव्यांग आधार असोसिएशन आटपाडी – सांगलीच्या कल्पना दबडे, राष्ट्रवादी काँग्रेस लोहारा तालुका उपाध्यक्ष सलमान सवार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी शामसुंदर सोनी, राहूल पाटील, प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवशटवार, रमाकांत जोशी, सुनिल साळुंके, प्रा.विद्या हातोलकर, प्रकाश कामत, उस्ताद शैफुद्दीन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच वधू-वर सुचक मेळाव्यासाठी शुभेच्छा दिल्या. सदरचा मेळावा प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवशटवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. त्यांनी याप्रसंगी बोलताना सामाजिक न्याय विभाग, लातूर लवकरच दिव्यांग वधू-वरांसाठी नविन ॲप विकसित करणार असल्याचे सांगितले. तसेच मेळाव्याचे संयोजक बालाजी नादरगे यांनी दिव्यांगांचे वधू-वर परिचय मेळाव्याचे दरवर्षी आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच नोंदणी केलेल्या दिव्यांग बांधवांचे विवाह जुळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी राष्ट्रीय पॅरालिंपिक खेळाडू प्रयागताई पवळे यांचा प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवशटवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी नादरगे यांनी केले. तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर राठोडे यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.बी.एम.बालवाड, अंजली चलवाड, संध्या गुंजारे, यास्मिन शेख, लक्ष्मी घोडके, महेश काळे, बाबूराव ढेले, विठ्ठल शेळगे, रमाकांत इरलापल्ले, राम बेंबडे, संजय शिंदे, प्रविण वाघमोडे, प्रयागताई पवळे, दगडू सगर, सूर्यकांत कोरे, निवृत्ती सुर्यवंशी, ज्ञानोबा माने, सुरेखा परीट, कविता भंडारे, सुनिता कज्जेवाड, भिमराव गिर्दवाड, सविता बुगे, संभाजी गोपे, गोरक पालमपल्ले, माधव मुंडकर, शंकरबावा गिरी आदींनी परिश्रम घेतले. मूकबधिरांसाठी सांकेतिक भाषातज्ञ म्हणून निवासी मूकबधिर विद्यालय, उमरगा येथील विशेष शिक्षक भावना नान्नजकर, स्वामी समर्थ मूकबधिर विद्यालय धाराशिव येथील विशेष शिक्षक भगवानराव चौगुले, संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालय, कळंब येथील शिक्षक आश्रुबा कोठावळे यांचे दुभाषक म्हणून सहकार्य लाभले.