वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क – लोहारा / सुमित झिंगाडे
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार समिती महाराष्ट्र राज्याच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी शरद पाटील यांची निवड करण्यात आली आहे. अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य, या संघटनेची बैठक सोमवारी दि.२ जानेवारीला संपन्न झाली. यावेळी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांनी निवड करून त्यांना नियुक्तीपत्र दिले.
महाराष्ट्रात माहिती अधिकार, मानवीहक्क, पत्रकार संरक्षण, भ्रष्टाचार निर्मुलन, ग्राहक संरक्षण, कायद्याचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पत्रकार व माहिती अधीकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले या बाबत संघटितपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाऊन कार्यकर्त्यांचे संगठन तयार करून भ्रष्ट नोकरशाही चा माहिती अधिकार कायद्याचा वापर करून पर्दाफाश करणार आहे. सामाजीक, शैक्षणिक, सांस्कृतीक, वैद्यकिय क्षेत्रात, सरकारी कामात भ्रष्टाचार होत असल्यास त्या विरुध्द तक्रार देऊन उपोषण, अंदोलन करू अशी माहीती संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांनी दिली. या निवडी बद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.