वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
बँकेत असलेल्या बचत खात्यामुळे अपघातात मृत पावलेल्या कुटुंबियांच्या वारसाला महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अधिकाऱ्यांनी दोन लाख रुपयांची विम्याची रक्कम मिळवून दिली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन केलेल्या कामाचे परिसरात कौतुक होत आहे.निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेतील ग्राहक सुभाष रामा जामगे रा. अंबुलगा (बु) व हानमंतवाडी (अंबु) येथील दयानंद पडकोंडे या दोन्ही ग्राहकांचा मृत्यू झाला होता. त्यांचे बॅंकेत बचत खाते असल्यामुळे त्यांच्या परिवाराला लाभ मिळण्यासाठी बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री. गोनेवार साहेब, ऑफिसर चौगले साहेब, कॅशिअर पाटील साहेब, सीआरपी नंदा जमागे आणि कुसुम हरंगुळे, प्रभाग समन्वयक त्र्यंबक लहाने व गोविंद रावते या सर्वांच्या प्रयत्नांनी या दोन्ही परिवाराच्या वारसांना पंतप्रधान जीवन जोती बीमा योजनेअंतर्गत प्रत्यकी दोन लाख रुपये मिळवून देण्यात आले. सदरील दोन्ही मयताच्या कुटुंबियांना विमा रक्कम मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँक व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्याकडून पाठपुरावा करण्यात आला होता.