उस्मानाबाद –
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीचे औचित्य साधून उस्मानाबाद येथे गुरुवारी १५ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या वतीने अभियंता दिन साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात आदर्श अभियंत्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता डी. एस. देवकर हे होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, श्याम गोडभरले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश केंद्रे, कार्यकारी अभियंता नितीन भोसले, चंद्रकांत राऊळ, अर्जुन नाडगौडा, एस. जी. शिंगवन यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यकारी अभियंता भोसले यांनी प्रास्ताविक केले. यात त्यांनी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कार्याची माहिती सांगीतली. तसेच जि. प. अभियंता संघटनेच्या वतीने दरवर्षी राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. त्यानंतर आदर्श अभियंता म्हणून लघुपाटबंधारे विभागातील प्रभारी उपअभियंता एकनाथ तुकाराम सूर्यवंशी, अभियंता जोतिबा मुंडे, करुणा चक्रे यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी उपअभियंता संजय मांडगे, ओ. के. सय्यद, चिडगोपकर, कुलकर्णी, उपअभियंता मोहिते, आर. एन. शिंदे, जलसंधारण अधिकारी धनंजय बोरावके, प्रशांत दूधमांडे, शाखा अभियंता राजेश संगमकर, बाणाई संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिमन्यू कांबळे, शाखा अभियंता आर. जी. कांबळे, जलसंधारण उपविभागीय अधिकारी भारत देसाई, सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता अरुण सारंग प्रगतशील शेतकरी चक्रधर कदम, कनिष्ठ अभियंता विराज संदुपटला, सुभाष नगदे आदींसह सर्व विभागातील अभियंते उपस्थित होते. सूत्रसंचालन चैतन्य जाधव यांनी तर आभार ओ. के. सय्यद यांनी मानले.