महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने १२ वी परीक्षेच्या निकाल कधी जाहीर होणार याची घोषणा केली आहे. मंडळांनी जाहीर केल्याप्रमाणे १२ वी परीक्षेचा निकाल उद्या म्हणजे गुरुवारी (दि.२५) दुपारी दोन वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
या निकालाकडे लाखो विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. उद्या दुपारी दोन वाजता निकाल online जाहीर होणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी जाहीर प्रकटन प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हणले आहे की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी ) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर गुरूवार दिनांक २५/०५/२०२३ रोजी दुपारी २.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
१. mahresult.nic.in
२. https://hsc.mahresults.org.in
३. http://hscresult.mkcl.org ४. https://hindi.news18.com/news/career/ board-results-maharashtra-board
५ https://www.indiatoday.in/education-today/ maharashtra-board-class-
12th result 2023
६ http://mh12.abpmajha.com
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.