वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा – उमरगा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले व उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार फड यांनी मंगळवारी (दि. १८) लोहारा तालुक्यातील विविध गावांचा दौरा करून आरोग्यविषयक सोयी सुविधांचा आढावा घेतला. तसेच लसीकरणाची पाहणी केली.
या दरम्यान तालुक्यातील जेवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या लसीकरणाची पाहणी, जेवळी येथील शिवसेना विलगीकरण कक्षाची पाहणी, फणेपूर येथे स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मोबाईल युनिटची पाहणी करण्यात आली. तसेच आष्टाकासार, अचलेर येथे शिवसेना व संबंधित ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येकी २० बेड्सच्या विलगिकरण कक्षाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी युवा नेते किरण गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे, गटविकास अधिकारी सोपान अकिले, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जगन पाटील, लोहारा पंचायत समितीचे माजी सभापती सिद्रामप्पा दुलंगे, माधव पाटील, आष्टाकासारचे माजी सरपंच सुलतानपुरे, अमोल सोमवंशी, प्रदीप मदने, सुरेश दंडगुले, नामदेव बिराजदार, शिवराज चिनगुंडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.