वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथील आयसीड फाउंडेशनच्या वतीने विविध उपक्रमांद्वारे आर्थिक मागास गटातील मुला-मुलींसाठी विनामूल्य शिकवणी वर्ग, व्यक्तिमत्व विकास वर्ग, खेळाडूंना प्रोत्साहन त्याचबरोबर सरळसेवा स्पर्धा परीक्षा व पोलीस / सैनिक भरती करणाऱ्या तरुण-तरुणींना मार्गदर्शन सत्र आयोजित केले जातात. त्याचबरोबर संस्थेतर्फे कोरोना प्रादुर्भाव रोखणाऱ्या यंत्रणांना विविध प्रकारे मदत करणे चालू आहे. यामध्ये समाज माध्यमाचा वापर करून जनजागृती केली जात आहे. याच उपक्रमांतर्गत संस्थेतर्फे गुरुवारी (दि.१३) माकणी येथील आयसोलेशन केंद्रास ५०० सर्जिकल मास्क व कोरोना दक्षता समितीस ५० एन ९५ मास्क कोरोना दक्षता समितीकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी माकणी सरपंच तथा दक्षता समितीचे अध्यक्ष विठ्ठल साठे, उपसरपंच तथा समितीचे उपाध्यक्ष वामन भोरे, मार्गदर्शक गौरीशंकर कलशेट्टी, आयसीड संस्थेचे संस्थापक विष्णू शिंदे, कार्यकारी संचालक महेश शिंदे, आयसीडचा विद्यार्थी दिग्विजय कांबळे, शकील सय्यद तसेच अँड दादासाहेब जानकर, बाळू कांबळे, अभिमन्यु कुसळकर, सरदार मुजावर, सुभाष आळंगे, गोविंद साठे, नितीन पाटील, भास्कर ढोणे, ज्ञानेश्वर पवार, गोरख भोई आदी उपस्थित होते.