वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथे केंद्रस्तरीय शाळापूर्व तयारी अभियान मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याचे उदघाटन प्रभारी केंद्र प्रमुख एस.के. चिनगुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षका एम. एस. कुलकर्णी, केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ शिंदे, भोसगा शाळेचे मुख्याध्यापक एम.एम. डोखले, मुख्याध्यापक एस.बी. नागणे, साधनव्यक्ती संध्या बडुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शाळापूर्व तयारी अभियान राबविले असता विद्यार्थ्यांमध्ये होणारी प्रगती व या अभियानाचे स्वरूप केंद्र प्रमुख एस.के. चिनगुंडे यांनी स्पष्ट केले. तसेच एम.एस. कुलकर्णी यांनी अभियानाची रुपरेषा स्पष्ट केली.
या अभियानातील गतवर्षीचा आलेला चांगला अनुभव ए. एल. बाबळे या शिक्षकांनी स्पष्ट केले. यानंतर केंद्रातून आलेले मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ती यांच्या साहाय्याने नमुना दाखल शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी शिक्षक बी. व्ही. क्षीरसागर, टी. बी. सुरवसे, ए.बी. साखरे, ए.एम. शिंदे, एस.एन. भोसले, व्ही. एस. बुकन, बी. जी. डोके यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.