वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील उंडरगाव येथे श्री हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती देवस्थान कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.
तालुक्यातील उंडरगाव येथे श्री हनुमान जयंतीनिमित्त होणारा हा जयंती सोहळा दि. ५ ते ९ एप्रिल दरम्यान होणार आहे. या कालावधीत धार्मिक व सांस्कृतिक भरगच्च कार्यक्रम चालणार असुन यात मल्लांसाठी कुस्ती, नाट्यप्रेमीकरीता सौभाग्य नाही माझ्या नशिबी हे नाटक तर संगीत रसीकासाठी रविराज सारस्वत गायीका अंजली मुसांडे ग्रुप पुणे, तसेच ऑर्केस्ट्रा, लावण्यरंग, झलक महाराष्ट्राची हा कार्यक्रम, भारुड, कीर्तन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या सोहळ्यानिमित्त मंदिरावर आकर्षण विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दि. ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता अंजली मुसांडे, रविराज सारस्वत ग्रुप गायन कलामंच पुणे, दि. ६ रोजी हनुमान जन्मोत्सव दिनी पहाटे हनुमान मुर्ती दूध व तेलाभिषेक गुलाल उधळन, महादेव कावड मिरवणूक होणार आहे. रात्री ८ वाजता शोभेच्या दारूची आतिषबाजी व रात्री ९ वा ह.भ.प. वैष्णवी मुखेकर करंजीघाट अहमदनगर यांचे किर्तन, दि. ७ रोजी सकाळी श्रीच्या मुर्तीची मिरवणूक, जंगी भारुड व रात्री ९ वाजता सौभाग्य नाही माझ्या नशिबी नाटक, दि. ८ रोजी दुपारी ४ वाजता जंगी कुस्त्या व रात्री ९ वाजता लावण्यरंग ऑर्केस्ट्रा, दि. ९ रोजी महाप्रसाद व रात्री झलक महाराष्ट्राची हा कार्यक्रम होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन उंडरगाव ग्रामस्थांनी केले आहे. यात्रा कालावधीत अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौकासह मंदीर परिसरात जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे अशी माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.