श्री. अतुल कुलकार्णी पोलीस अधीक्षक उस्मानाबाद यांचे आदेशाने व मा. अपर पोलीस अधीक्षक उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्हा हद्दीत अवैध धंदयाची माहिती काढून कारवाई करणेकामी दि. 07.07.2023 रोजी एम. रमेश सहा. पोलीस अधीक्षक उपविभाग कळंब यांना पो.स्टे. उमरगा हद्दीत जकेकुर चौरस्ता शिवारात आले असता गुप्त बातमीदारा मार्फत लातुर जाणारे रोडचे कडेला असलेल्या सौदागर बार व रेस्टारंट येथे नियमाचे उल्लघंन करुन बार चालू ठेवून बारमध्ये अवैधरित्या महिला नृत्यांगनावर पैसे उधळून अश्लिल व बिभ्त्स हावभाव करुन नृत्य चालू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कळंब, पो. स्टे. कळंब व पोलीस स्टेशन उमरगा येथील अधिकारी व अंमलदार यांचेसह सौदागर बार व रेस्टॉरंट येथे छापा मारला तो खालील प्रमाणे
सौदागर ऑर्कस्ट्रॅा व रेस्टारंट मध्ये बार मॅनेजर कामगार यांनी शासनाने नेमुन दिलेल्या नियमावलीने व परवानाचे उल्लंघन करुन उशीरा पर्यंत बार चालू ठेवून बारमध्ये मोठ्या आवाजात म्युझीक सिस्टीमवर गाणे चालु लावुन बारमधील नमुद 09 महिला करवी बारमध्ये उपस्थितीत इतर आरोपी यांचे समोर अश्लिल हावभाव व नृत्य करुन सौदागर हॉटेल टेन लव्हर्स नावाचे कागदी कुपन स्टेजवरील नृत्य करणाऱ्या महिलांवर उडवत अश्लिल हावभाव व नृत्य करीत असताना मिळून आले म्हणून यातील बार चालकास एकुण 35 इसमाविरुध्द कलम 188, 294, भ.दं.वि. सह कलम 33(w)/131 महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि कलम 3, 8(1), 8(2), 8 (4) महिलांच्या अश्लिल नृत्यास प्रतिबंध घालणे व महिलाच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्या बाबतचा अधिनियम 2016 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयातील आरोपीताच्या कब्जातुन रोख रक्कम 1,05,830 ₹ व 07 कार, 04 मोटरसायकल, 29 मोबाईल व सौदागर हॉटेल टेन लव्हर्स नावाचे कागदी कुपन असे एकुण 58,51,680 ₹ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. अतुल कुलकार्णी पोलीस अधीक्षक उस्मानाबाद यांचे आदेशाने व मा. अपर पोलीस अधीक्षक उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनाखाली एम.रमेश सा. पोलीस अधीक्षक उपविभाग कळंब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे उमरगाचे प्रभारी अधिकारी श्री. मनोजकुमार राठोड, सपोनि श्री. महेश क्षिरसागर, पो.स्टे. कळंब व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कळंब पोउपनि श्री. पुजरवाड, पोलीस अंमलदार फतेपुरे, तारळकर, गायकवाड,पोलीस हावलदार शिंदे, पोलीस ठाणे कळंबचे पोलीस नाईक- शेख, पोलीस अंमलदार भांगे, पठाण, खांडेकर, गरड, राउत, चव्हाण, पोलीस ठाणे उमरगाचे पोलीस हावलदार मुंढे, महिला पोलीस हावलदार सुनिता राठोड यांचे पथकाने कामगिरी केली.