वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील मुरुम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व हिंदी विभागाच्या वतीने हिंदी साहित्यिक प्रेमचंद यांची जयंती शनिवारी (दि.३१) साजरी करण्यात आली. प्रारंभी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते प्रेमचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. प्रेमचंद यांचे जीवन व साहित्य या विषयावर हिंदी विभाग प्रमुख डॉ. नागोराव बोईनवाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. बोईनवाड यांनी प्रेमचंद यांनी प्रतिकूल काळात त्यांच्या साहित्यातून समाजातील विविध समस्यांचे दर्शन, त्याकाळी समाजात होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम साहित्यातून त्यांनी केले. त्यामुळेच ते भारतीय उपन्यासकार, कहानीकार तथा प्रसिद्ध लेखक बनू शकले. म्हणूनच त्यांना आधुनिक हिंदीचे पितामह असे म्हटले जाते असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संजय गुरव होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, प्रा. प्रतापसिंग राजपूत, डॉ. रमेश आडे, डॉ. राजु शेख, प्रा. गोपाळ कुलकर्णी, डॉ. पुरुषोत्तम बारवकर, डॉ. सुभाष हुलपल्ले आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. रवि आळंगे यांनी तर आभार प्रा. सुजित मटकरी यांनी मानले.