वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेशदाजी बिराजदार व लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके या दोघांचा जन्मदिन २० ऑगस्ट रोजी असल्याने दोघांच्याही वाढदिवसाचे औचित्य साधून मुरूम शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी चषक या नावे क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करीत सुरेशदाजींचा जन्मदिन उत्साहात साजरा करण्याचा व शहरातील युवकांना खेळाकडे करिअरच्या संधी म्हणून पाहण्याचा एक अप्रतिम उपक्रम राबविण्यात येत आहे.रविवारी (दि.८) या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी औरंगाबाद उच्च न्यायालयाचे वकील ॲड. दयानंद माळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रा. दत्ता इंगळे, शहराध्यक्ष विठ्ठल पाटील, भाऊसाहेब बिराजदार सहकारी कारखान्याचे संचालक योगीराज स्वामी, येणेगुर गटातील नेते नेताजी कवठे, पत्रकार रफिक पटेल, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष श्रीधर इंगळे, एआयएसएफचे जिल्हाध्यक्ष लखन भोंडवे, तालुकाध्यक्ष ॲड. अतुल दासमे, युवा उद्योजक अतुल सावंत, गोविंद सोबाजी, सुरज शिंदे, योगेश पोतदार आदींच्या प्रमुख उपस्थितीत युवा खेळाडूंचे स्वागत करीत क्रिकेट टूर्नामेंटचे उद्घाटन करून सुरवात करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रा. दत्ता इंगळे सरांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व मान्यवरांच्या हस्ते टॉस करून क्रिकेट सामन्यास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.या क्रिकेट टूर्नामेंटचे प्रथम पारितोषिक सात हजार रुपये व चषक तर दुसरे पारितोषिक चार हजार रुपये व चषक आहे. या स्पर्धेसाठी शहरातील १४ संघांनी सहभाग नोंदवला आहे. या क्रिकेट सामन्याचे संयोजन प्रमोद गायकवाड, महेश मुरूमकर, राजु नदाफ यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केले. या राष्ट्रवादी चषकचे दमदार आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन जाधव, शहराध्यक्ष बाबा कुरेशी व सर्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या टीमने केले आहे.