वार्तादूत -डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते घरी उपचार घेत असल्याचे समजते.
मागील काही दिवसांपासून नागरिकांमध्ये कोरोनाची भीती कमी झाल्याचे दिसून येत आहे. कारण बहुतांश जण विनामस्क सार्वजनिक ठिकाणी जात आहेत. तसेच प्रशासनाकडून जे नियम सांगण्यात आले आहेत. त्याचे पालन होताना दिसत नाही. परंतु यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. मागील काही दिवस कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी सध्या ती हळू हळू वाढत चालली आहे. त्यामुळे प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक झाले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी जाताना प्रशासनाने जे नियम सांगितले आहेत त्याचे पालन करणे आवश्यक आहे.
मागील काही दिवसांपासून विविध कामांसंबंधी नागरिकांची जिल्हाधिकारी कार्यालयात येणे जाणे वाढले आहे. त्यात बहुतांश व्यक्ती मास्क न वापरता फिरताना दिसत आहे. परंतु यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो हे सर्वांनी विसरल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोना चाचणी केली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते घरी उपचार घेत आहेत अशी माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे त्यांनी काही दिवसांपूर्वी कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्याचे समजते. सध्या ते घरी असले तरी शासकीय कामात खंड पडू नये यासाठी वर्क फ्रॉम होम करणार असल्याचे समजते.
सध्या दिवसेंदिवस हळू हळू कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तसेच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सार्वजनिक ठिकाणी जाताना नेहमी मास्क वापरणे, कोरोनाची काही लक्षणे आढळली तर तात्काळ चाचणी करून घेणे आवश्यक आहे.