उस्मानाबाद प्रतिनिधी –
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या जिल्हा कोषाध्यक्षपदी जगदिश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. स्वच्छता व पाणीपुरवठा, पर्यावरण राज्यमंत्री मा.ना.संजय बनसोडे यांच्या हस्ते शनिवारी ( दि.२६) उस्मानाबाद येथे नियुक्तीपत्र देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध उपक्रमातून पक्ष वाढीसाठी काम करणारे करजखेडा येथील जगदीश पाटील यांच्यावर जिल्हा कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षवाढीसाठी पाटील यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन जिल्हा कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. पक्ष बळकटीकरणासाठी पक्षात काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्याची ही निवड असल्याचे बोलले जात आहे. शनिवारी ( दि. २६) स्वच्छता व पाणीपुरवठा, पर्यावरण राज्यमंत्री मा. ना.संजय बनसोडे हे उस्मानाबाद शहरात आले होते. त्यांच्या हस्ते जगदीश पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार, माजी आमदार राहुल भैय्या मोटे, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोविंद तात्या साळुंके, माजी तालुकाध्यक्ष किशोर साठे, उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, जालिंदर कोकणे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष पृथ्वीराज जगताप यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडीबद्दल जगदीश पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.





