भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद येथे आज दि. २६ जून रोजी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते रेशीम कोष उत्पादक उद्यमी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद उस्मानाबाद राहुल गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण घेवून आपला स्वतःचा रेशीम कोष निर्मिती व्यवसाय सुरु करावा आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये रेशीम कोष विक्रीचे मार्केट सुरु करावे. व्यवसाय सुरु करण्यासठी लागणारे ज्ञान हे या प्रशिक्षणाच्या माध्यमातून घेवून स्वतः उद्याजोक बनून इतरांना हि रोजगार मिळवून द्यावा असेही सांगितले.
यावेळी संस्थेचे संचालक मुकेश कुमार यांनी संस्थेबद्दल माहिती सांगितली. प्रशिक्षण घेवून यशस्वी व्यवसाय सुरु करण्यासाठी संस्था २०११ पासून ग्रामीण भागातील युवकांना मार्गदर्शन करत आहे. याप्रसंगी श्री. महेंद्र कुमार मुख्य प्रबंधक बँक ऑफ महाराष्ट्र, श्री. एम. जे. लावंद जिल्हा रेशीम कार्यालय, श्री. बालाजी पवार, श्री. गणेश आदटराव व श्री. अतुल लुगडे ई. प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र-संचालन सौ. जीवनज्योती सरपाळे आरसेटी प्रशिक्षिका यांनी केले. व आभार श्री. अवधूत पौळ यांनी मानले.