वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्हा परिषदेची वेबसाईट अपडेट करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कोषाध्यक्ष जगदीश पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हणले आहे की, उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या वेबसाईटची तुलना शेजारील जिल्ह्यांच्या वेबसाईटशी केली तर उस्मानाबादची वेबसाईट खूपच खूपच त्रोटक माहिती व हाताळण्यास अवघड आहे. लातूर जिल्ह्याच्या वेबसाईटवरविविध योजना, पात्रता, जबाबदार अधिकारी यांची सविस्तर माहिती आहे. हे आपणास लातूरवेबसाईट च्या मुखपृष्ठावरूनच समजून येते. तिथे अधिकाऱ्यांचे खरे मोबाईल नंबर, फोटो अपलोड केलेले आहेत. तुलनेत आपल्या वेबसाइटवर कधीही न लागणारे लँडलाईन नंबर आहेत. तसेच पुरेशी माहिती नाही. खासकरून शासकीय योजनांची सविस्तर माहिती नाही. त्यासाठी उस्मानाबादला दोन तीन चकरा माराव्या लागतात. तेंव्हा कुठे योजना समजते. आजच्या तांत्रिक युगात प्रत्येकाच्या हातात मोबाईल असताना वेबसाईटवर जेवढी माहिती सविस्तर देता येईल तेवढे नागरिकांचे व प्रशासनाचे कष्ट वाचणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदची वेबसाईट अपडेट करण्यात यावी अशी मागणी जिल्हा कोषाध्यक्ष जगदीश पाटील यांनी केली आहे.

एकेकाळी उस्मानाबाद जिल्हा परिषद ही महाराष्ट्रात एक नंबरची जिल्हा परिषद म्हणून नावाजली होती. परंतु याच जिल्हा परिषदेच्या वेबसाईट अपडेट करण्याची मागणी करण्याची वेळ येत असल्याने जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
error: Content is protected !!
No Result
View All Result