वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा गावच्या सरपंच तथा उस्मानाबाद महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा सुनिता पावशेरे यांनी मकरसंक्रांतीच्या निमित्ताने तीळ गुळ देण्यासाठी येणार्या सर्वच महिलांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ, रमाबाई आंबेडकर अहिल्याबाई होळकर आदी शूर, कर्तबगार महिलांच्या जीवन चरित्रावरील पुस्तके संक्रातीचे ‘वाण’ म्हणून भेट दिले. ग्रामीण भागातील महिलांना त्यांचा आदर्श घेता येईल हा यामागचा उद्देश होता. मकरसंक्रांतीला ग्रामीण भागात वस्तू देण्याची पद्धत आहे. परंतू वस्तू पेक्षा कर्तबगार, आदर्श महिलांचे जीवन चरित्र महत्वाचे व मौल्यवान आहेत. याचाच खरा उपयोग आजच्या महिलांना होणार असून हा उपक्रम नक्कीच आम्हाला आवडल्याचे या प्रसंगी सर्वच महिलांनी प्रतिक्रीया दिल्या. सरपंच सुनीता पावशेरे या दर वर्षी प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. या प्रसंगी सुरेखा घोटमाळे, भाग्यश्री घोटमाळे, मंगल आलमले, प्रभावती कुलकर्णी, ज्योती कुलकर्णी, सपना कारभारी, कल्पना कारभारी, पुनम जकेकुरे, रेवती जकेकुरे, मनिषा यलोरे, मांडवी दळवे, सविता स्वामी, वैष्णवी स्वामी, साक्षी सुरवसे, शाहूबाई सुरवसे, पल्लवी डोणगावे, अर्चना डोणगावे, पूनम डोणगावे, सुवर्णा डोणगावे, मंगल आलमले, शिवकन्या यलोरे, आशा पुजारी, रुक्मिणी कुलकर्णी, पार्वती पावशेरे, शोभा पावशेरे, मंगल पावशेरे, आशा पुजारी, रुक्मिणी कुलकर्णी, पार्वती पावशेरे, शोभा पावशेरे, मंगल पावशेरे, पद्मिनबाई पावशेरे, वीणा पावशेरे, रोहिणी पावशेरे आदी महिला, युवती उपस्थित होत्या.